Pune CNG pump Accident: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आपण अनेकदा अपघातांचे व्हिडीओही पाहिले असतील. अशा अपघातांत काही जण आपला जीव गमावतात; तर काहींना जीवदान मिळतं. भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा पेट्रोल पंप, सीएनजी पंपावर असे अपघात होताना दिसतात. म्हणून या ठिकाणी अनेकदा पेट्रोल भरताना फोन वापरू नये किंवा सीएनजी भरताना कारमध्ये किंवा बाईकवर बसू नये, अशा सूचना दिल्या जातात. अशा वेळेस सावधगिरी बाळगून वेळीच योग्य ते पाऊल उचलल्यास संकट टळू शकतं. सध्या याच स्वरूपाची एक दुर्घटना सीएनजी पंपावर घडलीय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या दुर्घटनेमध्ये तिथल्या कर्मचाऱ्याच्या डोळ्याला दुखापत होते आणि त्याने डोळाच गमावतो.

हेही वाचा… ट्रेनमध्ये प्रवाशांनीच घेतली टीसीची शाळा, तिकीट तपासायला आली अन्…, VIDEO पाहून व्हाल चकित

व्हायरल व्हिडीओ

पुण्यातील एका धक्कादायक घटनेत CNG पंपावर गॅसचा नोझल उडाल्याने तिथे काम करणार्‍या तरुणाला डोळा गमवावा लागला. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊ…

पुण्यात हत्ती चौक , चव्हाणनगर येथे असलेल्या CNG पंपावर तेथील एक कर्मचारी सीएनजी भरण्यासाठी उभा होता. यादरम्यान तिथे आणखी तीन माणसं उभं होती. सीएनजी भरताना अचानक गॅसचा नोझल उडाला. त्यामुळे घाबरत सगळ्यांनी तिथून पळ काढला. पण, ही घटना त्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली. गॅसचा नोझल उडाल्याने त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्याला दुखापत झाली आणि त्याने आपला डोळा कायमचा गमावला.

हा व्हिडीओ @pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “पुण्यात CNG पंपावर गॅसचा नोझल उडाल्याने तरुणाने गमावला डोळा… पंपावर असताना काळजी घ्या,” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… नवरा म्हणून अपयशी ठरला! बाईकवरुन पती-पत्नी खाली पडले मात्र शिक्षा त्यानं तिलाच दिली; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “टू व्हीलर सीएनजी बंद करा.” दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलं, “खूपच वाईट झालं.” एकानं, CNG पंपावर हेल्मेट घालून काम करावं, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune employee loses eye after cng nozzle hits his eye while filling gas in cng pump viral video dvr