जगभरात कुठेही गुरूंना आणि शिक्षकांना सर्वसाधारणपणे आदर दिला जातो. काहींना आदर आणि प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या सदसद्विवेकाचा भाग होतात. हे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाहीत, तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. जी स्वप्ने मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे शिक्षक प्रयत्नशील असतात.काळानुसार शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले संबंध हे नात्यांमध्ये बदलत केले. अशाच एका उदाहराणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी, तालुका शिरूर शाळेतील ६५ मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षिकेला नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केला! त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी तालुका शिरूर येथील शिक्षका सौ.धुमाळ मॅडम यांनी विशेष परिश्रम घेत इयत्ता पाचवी मधील ६५ विद्यार्थी स्कॉलरशिप ला पात्र ठरल्याने ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षिका मेघा तुकाराम धुमाळ यांचा सन्मान केला. एवढचं नाहीतर त्यांना नवी कोरी गाडी भेट दिली. शिक्षणाला दिले जाणारे महत्व आणि त्यातून घडणार उद्याची पिढी याला महत्त्व देताना, यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असणाऱ्या शिक्षकांनाही गावकऱ्यांनी दिलेला मान याचं सर्वत्रच कौतुक होत आहे. राजकीय इव्हेंटसाठी पैसे खर्च न करता खरोखरंच जे समाजासाठी झटत आहेत त्यांची दखल घेत ग्रामास्थांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

chairperson state women commission rupali chakankar on alandi unauthorized warkari educational institution
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर दोन दिवसांत करवाई करा; राज्य महिला आयोगाच्या सूचना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Satyagraha for free education in Vinoba Bhaves gagode village
विनोबा भावे यांच्या गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह…
Retired teacher and his son got cheated for Rs 30 lakhs Accuseds bail application rejected
निवृत्त शिक्षकासह मुलाची ३० लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे, आनंदाने अश्रू अनावर..VIDEO व्हायरल

विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो. सोशल मीडियावरही या शिक्षिकेचं कौतुक होतंय.

Story img Loader