Gadar 2: सनी देओलचा गदर २ सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे गदर २ मुळे पुन्हा एकदा चित्रपटगृहांची शान परत आली आहे. गदर २ च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तारा सिंग आणि सकिना यांच्या कमबॅकवर आता प्रेक्षक प्रतिक्रिया देत आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर हा चित्रपट चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. गदर: एक प्रेम कथा हा सिनेमा २००१ मध्ये आला होता. त्यानंतर आता २२ वर्षानंतर या सिनेमाच्या सिक्वेलने धमाका केलाय. . अशातच आता देशाच्या विविध भागातून व्हिडीओ समोर येत आहेत. त्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता ही बघायला मिळत आहे. चाहते या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसत आहेत. ‘गदर २’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एवढा उत्साह आहे की, सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. परिस्थिती अशी आहे की चाहते मॉलच्या पार्किंगमध्ये त्यांच्या कारऐवजी ट्रॅक्टर आणि ट्रक पार्क करताना दिसले. प्रत्येक ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये तब्बल २०-२० लोक भरून आले होते. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील असल्याची माहिती मिळाली आहे. आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केलाय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – तुमच्या आवडत्या बिस्किटाला ‘पार्ले जी’ नाव कुठून आले? बिस्किटावर असलेली छोटी मुलगी म्हणजे सुधा मूर्ती? जाणून घ्या

पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये गदर २ ने बाजी मारली होती तर आता दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे देखील समोर आले आहेत. गदर २ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्यात दिवशी ४०  ते ४५ करोड रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील गदर २ ने ४० कोटींची कमाई केल्याचं समोर येत आहे. रिपोर्टनुसार, दोन दिवसात सिनेमाने ८३.१८ कोटींची गल्ला जमवला आहे. 

Story img Loader