Viral News: सोशल मीडियावर कधी- कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्याची आपण कधीच कल्पना केली नसते. असाच व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, ज्यात खेळण्यांशी खेळण्याच्या वयात लहान मुलगी चक्क गाडी चालवताना दिसतेय. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संबंधित मुलाचे कौतूक केले आहे. मात्र, काही जणांनी चिंता व्यक्त केली आहे. या वयात स्कूटी चालवणे धोकादायक ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने लहान मुलीला स्कूटी चालवायला दिली आहे आणि तो आरामात मागे बसला आहे.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण संभाजीनगरमधले असल्याचे सांगितले जात आहे.

रोड सेफ्टी अर्थात् रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमीच चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दर वर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. याच पृष्ठभूमीवर अल्पवयीन मुलांना ड्रायविंग पासून रोखण्यासासाठी सरकार आता कडक पावलं उचलत आहे. लहान मुलाला बाईक, कार किंवा कार चालवायला परवानगी देणाऱ्या आई-वडिलांवर कारवाई केली जावू शकते.अवघ्या सहा-सात वर्षांची ती मुलगी अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवत होती; ज्यामुळे अपघात होऊन हानी होण्याची शक्यताही होती. लहान मुलांना गाड्यांचे आकर्षण जरी असले तरी प्रत्यक्षात मात्र १८ वर्षांखालील मुलांना सरकारी नियमानुसार गाडी चालवायला बंदी आहे. तरीही या मुलीच्या हातात पालकांनी गाडीचे स्टेअरिंग दिले असून, मुलगी भर रस्त्यात सुसाट गाडी चालवताना आपल्याला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ना अश्लील डान्स ना स्टंटबाजी; तरी ३० कोटी लोकांनी का पाहिला असावा हा VIDEO? महिलेने असं काय केलं तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ khushivideos1m नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत लिहिले, “श्रीमंत लोक काहीही करू शकतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “या प्रकरणी गंभीर कलमे लावून कारवाई करणे गरजेचे आहे आणि मुलांआधी पालकांना शिकवा”.” या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी थारच्या मालकावर कारवाई केली आहे.

Story img Loader