सध्या फोटो सोशल मीडियावर एक तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो उत्तरपत्रिकेचा आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्याने जे काही लिहिले ते पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. व्हायरल फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेमात पडलेली व्यक्ती काय करेल याचा काही अंदाज बांधता येणार नाही. अनेकदा प्रियकर आपल्या प्रेयसी नाव आपल्या हृदयावर नाव कोरले आहे असा दावा करतात. हृदयाच्या प्रत्येक भागावर एकीचे नाव कोरणारी व्यक्ती तुम्ही कधीही पाहिली नसेल. पण एका विद्यार्थ्याच्या हृदयावर एका मुलीचे नव्हे तर ५ मुलींचे नाव कोरले आहे.
विद्यार्थ्याच्या हृदयावर कोरले पाच जणींचे नाव
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memes_connection नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एका मुलाची उत्तरपत्रिका शेअर करण्यात आली आहे. मात्र, ही उत्तरपत्रिका खरी आहे की, बनावट याची पुष्टी करण्यात आलेली नाही. परीक्षेत हृदयाची आकृती काढून त्याच्या प्रत्येक भागाला नाव देऊन त्याचे कार्य लिहिण्यास सांगितले आहे पण या विद्यार्थ्याने हृदयाचे अप्रतिम चित्र तर काढलेच, पण त्यानंतर आकृतीला नावे देताना मोठा गोंधळ केला आहे.
हृदयाच्या प्रत्येक भागाला नाव देण्याऐवजी त्याने आपल्या हृदयाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्या मैत्रिणींची नावे लिहिली आहेत. फोटोमध्ये प्रिया, नमिता, हरिता, रूपा, पूजा या मुलींची नावे लिहिलेली दिसत आहेत. हृदयाच्या या वेगवेगळ्या भागांच्या नावांसोबरोबर त्यांच्याबरोबरचे नाते कसे हे देखील त्याने खाली दिली आहे.. प्रियाच्या नावासमोर विद्यार्थ्याने लिहिले की, ती नेहमी त्याच्याशी इन्स्टाग्रामवर चॅट करते, त्याला ती आवडते. स्नॅपचॅटवर त्याच्याशी चॅट करणारी रूपा खूप सुंदर आणि गोंडसही आहे. नमिता ही त्याच्या शेजाऱ्याची मुलगी आहे, तिचे केस लांब आणि मोठे डोळे आहेत. पूजा ही या मुलाची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि तो तिला विसरू शकत नाही. हरिता त्याची वर्गमैत्रिणी आहे. या परिस्थितीनुसार फोटोला “तु मेरे दिले मे रहती है” हे गाणे जोडले आहे.
हेही वाचा – हत्तीच्या पिल्लाने लुटला अंघोळीचा आनंद! Viral Video पाहून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू
विद्यार्थ्याचे उत्तर वाचून शिक्षकांनी त्याला १० पैकी ० गुण दिले आहेत आणि पालकांना बोलव असे देखील लिहिले आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात”