भारतीय जवानांप्रती देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात खूपच आदर आणि सन्मान आहे. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही कठीण प्रसंगी ते देशातील लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास तत्पर असतात. मात्र ते सुद्धा माणूस आहेत आणि त्यांनाही जीवनाचा आनंद लुटण्याचा अधिकार आहे. सोशल मीडियावर भारतीय जवानांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ सगळ्यांनाच आवडतात आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होतात. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काश्मीर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. हिवाळ्यात तर येथील सौंदर्य आणखीनच फुलते. हे सौंदर्य पाहिल्यानंतर कोणाचेही डोळे दिपून जातील. अशा सुंदर वातावरणात भारतीय जवान डान्स करत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला असून तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

indian students in canada over indo canada relation
भारत-कॅनडा बिघडलेल्या संबंधांमुळे तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांचे काय होणार?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Diwali bonuses credited to Tata Motors employees accounts less than 24 hours after Ratan Tatas death
‘भारतीय’ टाटाची ‘जागतिक’ नाममुद्रा
Fraud by luring the job in the city of Moldova in Europe Mumbai print news
युरोपातील बल्लवाचाऱ्याची नोकरी पडली पावणेआठ लाखांना
What is the right time to consume sweets during the festive
सणासुदीच्या दिवसात मिठाईचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती

१८ फुटाच्या अजगराने एका दमात गिळली ५ फुटाची मगर; नंतर अशी हालत झाली की…

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण जवानांना ‘काला चष्मा’ या गाण्यावर नाचताना पाहू शकतो. तुम्ही आतापर्यंत या गाण्यावर शूट केलेले अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असतील. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडीओ आठवणार नाही. या व्हिडीओमध्ये आपण या जवानांना आनंदाने नाचताना पाहू शकतो. हे क्षण पाहिल्यानंतर तुम्हीही आनंदून जाल. इतकंच नाही तर इतक्या कडाक्याच्या थंडीतही जवानांचा हा आनंद आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरीना कैफ यांच्या ‘बार बार देखो’ या चित्रपटातील ‘काला चष्मा’ हे गाणे गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडमध्ये आहे. या गाण्यावरील डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. जवानांचा हा डान्स आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतही सतत आनंदी राहण्याची प्रेरणा देतो.