महत्वाची बाब म्हणजे थॉमस नावाच्या पायलटने जे काही मनमोहक दृश्य पाहिले ते त्यांने इतरांना सांगितले असते तर कोणाला ते खरे वाटले नसते. परंतु त्याने हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे अनेकांना त्यावर विश्वास ठेवावा लागत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यातील दृश्य स्वर्गासारखी दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर हे दृश्य पाहून आपण मंत्रमुग्ध झाल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

थॉमसने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये या दृश्याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. त्याने लिहिलं “मी पाहिलेले सर्वात सुंदर अरोरा बोरेलिस (नॉर्दर्न लाइट्स)! काल रात्री खूप सुंदर अरोरा बोरेलिस पाहायला मिळाले. हिरवे आणि लाल चमकदार पडदे. हे दुर्मिळ दृश्य नेदरलँड्समधूनही पाहायला मिळाले.” काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हाडीओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी तो लाईक केला असून अनेक नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा- लग्नानंतर ५ वर्षांनी महिलेचा सासरी जायला नकार, प्रियकरासाठी मोबाईल टॉवरवर चढली अन् केली विचित्र मागणी

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका युजरने विचारलं, “तुम्ही नॉर्दर्न लाइट्समध्ये उडू शकता का?,’ यावर थॉमसनेही उत्तर दिलं, हो नक्कीच, ‘कोणताही धोका नाही. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.” दुसऱ्या एकाने लिहिलं, “हे दृश्य किती सुंदर आहे, असं दृश्य पाहिल्यानंतर विमान चालवण्यावर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊ शकते.”

नॉर्दर्न लाइट्स म्हणजे काय?

नॉर्दर्न लाइट्स निसर्गाचे सौंदर्य दाखवितात. हे पृथ्वीवरील सर्वात मोठे लाइट शो मानले जातात. शास्त्राज्ञाच्या मते, नॉर्दर्न लाइट्स भूचुंबकीय वादळांच्या दरम्यान शक्तिशाली विद्युत चुंबकीय लहरींमुळे तयार होतात. म्हणजेच, जेव्हा सौर वादळ आपल्या दिशेने येते, तेव्हा काही ऊर्जा आणि लहान कण पृथ्वीच्या वातावरणात उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील चुंबकीय क्षेत्राच्या खाली सरकतात. येथे हे कण आपल्या वातावरणातील वायूमंडलाशी संपर्कात येतात ज्यामुळे आकाश रंगीबेरंगी बनते.

Story img Loader