सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ आपणाला थक्क करणारे असतात. तर व्हायरल व्हिडीओमध्ये कधीकधी धक्कादायक अपघातांचाही समावेश असतो. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एका इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरु असतानाच तो अचान कोसळल्याचं भयंकर दृश्य दिसत आहे. यावेळी इमारतीच्या बांधकामासाठी उपस्थित सर्व मजूर या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचंही दिसत आहे. या अपघाताचा व्हिडीओ @CollapseVids नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- बायको फूल देत म्हणाली ‘I Love You’; आजोबांनी दिलं जबरदस्त उत्तर, Video पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

हेही पाहा- मोठ्याने हॉर्न वाजवणाऱ्या ड्रायव्हरचा आधी मानपान, पुन्हा भयंकर शिक्षा; Video पाहून नेटकरी म्हणाले, प्रत्येकाला अशी अद्दल घडवा

व्हिडीओमध्ये एका इमारतीवर स्लॅब टाकायचे काम सुरु असल्याचं दिसत आहे. यासाठी अनेक कामगार इमारतीवर उभे असल्याचं दिसत आहे. अनेकांच्या हातात सिमेंटच्या पाट्या आहेत, तर काहीजण आपापल्या कामात मग्न असतानाच अचानक भल्यामोठ्या आकाराचा स्लॅब खाली कोसळताना दिसत आहे. स्लॅब कोसळताना मोठा आवाज झाल्याचंही ऐकू येत आहे.

आवाज होताच काही कामगार मागे पळून जातात, तर काही स्लॅबबरोबर खाली कोसळतात आणि ढिगाऱ्याखाली जातात. व्हिडीओच्या शेवटी काही कामगार सुदैवाने ढिगाऱ्यातून बाहेर आल्याचंही दिसत आहे. तर या व्हिडीओवर नेटकऱ्यानी नेहमीप्रमाणे वेगेवगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी बांधकाम करताना कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी हे खूप धोकादायक दृश्य असल्याचं म्हटलं आहे.