सोशल मीडियावर आज काल कित्येक डान्स व्हिडिओ पोस्ट केले जातात. प्रसिद्धीसाठी लोक अनेकदा विचित्र डान्स करताना दिसतात किंवा सार्वजनिक ठिकाणी डान्स करताना दिसतात पण प्रसिद्धीला भूलणाऱ्या लोकांमध्ये अजूनही उत्तम डान्स करणारे मोजकेच लोक असतात. अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वाजले की बारा गाण्यावर चिमुकलीने अफलातून लावणी सादर केली आहे.

“वाजले की बारा” हे गाणे नटरंग या मराठी चित्रपटातील आहे हे अनेकांना माहित आहे. अमृता खानविलकरने या गाण्यावर अफालतून नृत्य सादर करून लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आजही हे गाणे ऐकताच सर्वांना अमृताची आठवण येते पण व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकलीने इतका भन्नाट डान्स केला आहे की, अमृत्ता खानविलकरलाच थेट टक्कर दिली आहे.

Groom bride dance video in there wedding on marathi song video goes viral
VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
pune viral video man break all traffic rules
पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
Wedding video groom denies chain from father in law during marriage viral video on social media
जावई नंबर १! भरलग्नात नवरदेवाने सासऱ्यांचा आग्रह नाकारला, ‘ती’ गोष्ट घेण्यास दिला नकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
tharla tar mag fame sayali kusum and madhubhau dances on bollywood song
फिर भी ना मिला सजना…; ‘ठरलं तर मग’ फेम सायली, कुसुम अन् मधुभाऊंचा जबरदस्त डान्स! ‘ते’ गाणं ऐकून नेटकरी म्हणाले…
Pune Uncle Wins Hearts After Confronting Unruly Bike Rider with His Bicycle Watch Viral Video
“पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, बेशिस्त दुचाकी चालकाला सायकल घेऊन भिडले पुणेरी काका, Viral Video बघाच…

barkat.arora या इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा डान्स अफलातून आहेच पण तिच्या चेहऱ्यावरील भाव अगदी गाण्याला साजेसे आहेत. लावणी हा नृत्य प्रकार वाटतो तितका सोपा नाही पण तरीही चिमुकलीने इतक्या सुंदर पद्धतीने तो सादर केला आहे की नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडिओवर कमेंट करून अनेकांनी चिमुकलीचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली,”बरकत एकदम झक्कास बाळा”
दुसऱ्याने कमेंट केली, “खूप छान” तिसऱ्याने कमेंट केली की,”कडक”

चौथ्याने कमेंट केली की,””तिची एनर्जी नेहमीच जास्त असते”

बरकतची अफलातून डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेक गाण्यावर डान्स करून नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. चिमुकलीचे इंस्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोअरर्स आहेत.

Story img Loader