गेल्या दोन दिवसांपासून चीनमधली एक कंपनी चर्चेत आली आहे. या कंपनीतील सर्वच महिला कर्मचा-यांना सकाळी आपल्या बॉसला चुंबन देण्याची सक्ती करण्यात येते. चीनमधल्या प्रसिद्ध ‘पिपल्स डेली’ या वर्तमान पत्राने यासंबधीची बातमी समोर आणली आहे.
चीनमधील बिजिंग शहरात ही कंपनी असून येथील महिला कर्मचा-यांना काम सुरू करण्यापूर्वी बॉसला चुंबन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कंपनीतील महिला कर्मचा-यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सकाळी काम सुरू करण्यापूर्वी ९ ते ९.३० अर्धा तास महिला या रांग लावून आपल्या बॉसला चुंबन देतात. पिपल्स डेली या वर्तमान पत्राने यासंबधीची बातमी दिल्यानंतर ही कंपनी चर्चेत आली आहे. कंपनीतली ही अजब पद्धत ऐकून दोन महिला कर्मचा-यांनी येथे काम करणे सोडून दिले असल्याचेही या वर्तमान पत्राने म्हटले आहे. पण इथल्या अनेक महिलांना हे स्वागत चुंबन सवयीचा भाग झाला आहे. या संबधीची माहिती पुढे आल्यानंतर उलट सुलट चर्चा झाल्या. कंपनीच्या बॉसला या बद्दल जाब विचारला असता ही कंपनीची परंपरा असून, बॉस आणि महिला कर्मचारी या दोघांमधील नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी आपण असा प्रकार राबवत असल्याचा खुलासा त्याने दिला. इतकेच नाही तर अमेरिकेतल्या एका कंपनीमध्ये देखील असा प्रकार राबवला जात असल्याचा दावा त्याने केला आहे.

Story img Loader