एक युरो किंवा डॉलरसाठी साधरण आजच्या घडीला अनुक्रमे ७४ ते ६६ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे डॉलर आणि युरोच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे कमीच आहे. पण जागच्या पाठीवर असेही काही देश आहे जिथे या देशाच्या चलनापेक्षा रुपयांचे मूल्य हे अधिक आहे. बेलारूस, व्हिएतमान, इंडोनेशिया, कंबोडिया, पेराग्वे, मंगोलिया, कोस्टा रिका, हंगेरी यांसारख्या देशांत रुपयांचे मूल्य हे त्या देशाच्या चलानापेक्षा अधिक आहे. त्यामुळे या देशांत कधी सहलीसाठी तुम्ही गेलात तर तुम्ही भरभरून खरेदी करु शकता पण त्याचबरोबर तुम्ही श्रीमंत देखील होऊ शकता.
पुढील देशांत रुपयाचे मूल्य अधिक
बेलारुस : १ रुपया – २१६ रुबल्स
व्हिएतनाम : १ रुपया – ३३८. ३५ डाँग
इंडोनेशीया : १ रुपया- २०४.७६३ रुपय्या
पेराग्वे : १ रुपया – ७४.२६ गुरानी
कंबोडिया : १ रुपया- ६३.९३ रिआल
मंगोलिया : १ रुपया- २९.८३ तुगरीक
कोस्टा रिका : १ रुपया – ८.१५ कोलोन्स
हंगेरी : १ रुपया – ४.२२ फोरिंट
श्रीलंका : १ रुपया- २.०८ श्रीलंकन रुपी
नेपाळ : १ रुपया- १.६ नेपाळी रुपी