गर्भधारणा टाळण्यासाठी सध्या अनेक उपाय उपलब्ध आहेत. यामध्ये अगदी कंडोमपासून ते गर्भनिरोधक गोळ्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. मात्र काही देशांमध्ये या गोष्टी इतक्या सहजपणे उपलब्ध नाहीत किंवा त्यांचा वापर करण्यावर निर्बंध आहेत. असाच एक देश आहे व्हेनेझुएला.
नक्की वाचा >> गाडीत प्रियकरासोबत सेक्स करताना झाला लैंगिक आजार; विमा कंपनी देणार ४० कोटींची नुकसानभरपाई
व्हेनेझुएलामध्ये गर्भपात करणं हे बेकायदेशीर आहे. त्यामुळेच गर्भनिरोधक साधनांची किंमत इतर देशांच्या तुलनेत फारच अधिक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर व्हेनेझुएलामध्ये कंडोमच्या एका पाकिटाची किंमत ६० हजार रुपये इतकी आहे. मात्र असं असलं तरी या देशात अनेकजण गर्भनिरोधक साधनांचा वापर करतात. अनेकदा या साधनांचा तुटवडा निर्माण होतो. मात्र या साधनांच्या खरेदीसाठी दुकानांबाहेर अनेकदा येथील लोकांची झुंबड उडाल्याचं चित्र पहायला मिळालं.
देशामध्ये गर्भपात बेकायदेशीर असल्याने या ठिकाणी गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम औषधांच्या दुकानांमध्ये आणि सुपरमार्केट्समध्ये लवकर उपलब्ध होत नाहीत. या गोष्टी उच्च किंमतीला विकल्या जातात. या गोष्टींचा पुरवठा झाला की काहीवेळात त्या संपलेल्या असतात इतकी मागणी या देशामध्ये आहे. त्यामुळेच या गोष्टींची विक्री काळ्या बाजारातही होते. मात्र काळ्या बाजारात या गोष्टींची किंमत दुप्पट किंवा तिप्पट आकारली जाते.
नक्की वाचा >> लग्नानंतर मित्राच्या सल्ल्याने एवढ्या व्हायग्राच्या गोळ्या खाल्ल्या की…; उत्तर प्रदेशमधील विचित्र घटना
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या अहवाल २०१५ नुसार व्हेनेझुएलामध्ये अल्पवयीन मुली गरोदर राहण्याचं प्रमाण हे लॅटीन अमेरिकन देशांमध्ये सर्वाधिक आहे. अनेक मध्य आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये अल्पवयीन मुली गरोदर राहण्याचं प्रमाण कमी झालेलं असताना व्हेनेझुएलामध्ये मात्र परिस्थिती जैसे थे आहे.
या देशामध्ये कंडोम सहज उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणी एचआयव्ही रुग्णांची संख्याही फार मोठी आहे. तसेच अशीच परिस्थिती दिर्घकाळ राहिल्यास या देशामधील एचआयव्हीबाधितांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते.