लग्नाचा मुहुर्त जवळ आला की वधू-वरासह सर्व नातेवाईकांची एकच तारांबळ उडते. योग्य मुहुर्तावर लग्न करण्यासाठी ही सर्व धावपळ सुरु असेत. मात्र, कोणी नवरदेव त्याची लग्नघटीका जवळ आली असताना आंदोलन करण्यासाठी बसल्याचं तुम्ही पाहिलं नसेल. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरदेव चक्क लग्नाला जात असताना रस्त्यावर आंदोलनला बसल्याचं दिसतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तराखंडमधील असून नवरदेव लग्नाला जाण्याआधीच आंदोलकांमध्ये जाऊन प्रशासनाचा निषेध करताना दिसतं आहे. नवरदेव आंदोलन करण्यासाठी गेल्याचं कारण म्हणजे, उत्तराखंडमधील काठगोदाम हैदाखान येथील रस्ता खूप खराब झाला आहे. मागील महिन्यात दरड कोसळल्यामुळे रस्त्यांवर मोठंमोठे खड्डे पडले आहेत. येथील लोकांना या रस्त्यांचा त्रास होतोय म्हणून रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आंदोलनाला बसले होते.

हेही वाचा- चक्क माशांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त, गावात कोणी पोरगी द्यायला धजेना त्यामुळे अविवाहित त्रस्त

त्याचवेळी या मार्गावरुन एक नवरदेव त्याच्या सजवलेल्या कारमधून निघाला होता. त्याला देखील या मार्गावरुन जाताना खराब रस्त्याचा त्रास झाला होता. त्यामुळे जाता जाता नवरदेवा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन सुरु असल्याचं दिसताच तो गाडीतून उतरला आणि थेट आंदोलनकर्त्यांमध्ये जाऊन बसत सरकारचा निषेध करु लागल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

त्यामुळे आपल्या होणाऱ्या पत्नीला घरी घेऊन जायच्या आधी आंदोलन करणारा हा नवरदेव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, नवरदेवाने सांगितलं की, ‘येथील नागरिकांना रस्त्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत असून सरकारला अजिबात काळजी नाही.’ त्यामुळे जिथे अनेक नवरदेवांना आपल्या लग्नाची घाई असते तिथे या नवरदेवाने केलेले कृत्य बघून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.

मात्र, हा नवरदेव आंदोलनाच्या ठिकाणी पोहचल्यावर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी तेथील कार्यकर्त्ये उत्सुक झाल्याचं देखील व्हिडीओत दिसतं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता आलेलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ काँग्रेसनेते यशपाल आर्य यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. अनेक जणांनी हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काही लोकं म्हणत आहेत की अरे, आपलं लग्न सोडून असले उद्योग कोण करतो. तर काही लोकांनी या नवरदेवाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.