UttarPradesh Viral video: मुली आणि वडिलांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं. मुलांचा कायम मला एक मुलगी हवी असा सूर असतो. त्या चिमुकलीला हात घेतल्यापासून त्यांचा एक ऋणानुबंध निर्माण होतं. वडील सतत तिच्यावर प्रेमरुपी सावली घेऊन वावर असतो. आपल्या वडिलांना गमवण्याची वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये असे सगळेच म्हणत असतात. दरम्यान अशीच काहीशी घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे. आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या घातल्या. यात तो व्यक्ती जागेवरच कोसळला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

ही घटना उत्तर प्रदेशमधल्या शाहजहांपूरमध्ये घडली. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, शाहजहांपूरमधल्या बाबूजी परिसरात मोहम्मद शोएब हा तरुण आपली लहान लेकीला खांद्यावर घेऊन बाजारात जात होता. याचवेळी दोन तरुण दुचाकीवरुन त्याच्या पुढे काही अंतरावर थांबले. तर समोर येणाऱ्या एका तरुणाने मोहम्मद शोएबवर अगदी जवळून गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून फरार झाला.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?

पूर्ववैमनस्यातून हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शोएबचे लग्नावरुन एका कुटुंबाशी वाद सुरु होता. त्यानंतर त्याने दिल्लीतल्या दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं. शोएबचं सुरुवातीला लग्न ठरलं होतं. याच पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला गेल्याचा अंदाज असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स अन्…तुम्हीच पाहा हा VIDEO

हत्या, महिला अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश राज्य देशात अव्वल स्थानावर गेले आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर, त्या चिमुकलीसाठी हळहळ व्यक्त केली आहे.