Viral video : आपल्यातील अनेकांना लहान मुलं खूप आवडतात. लहान मुलं गोंडस असली तरीही त्यांना सांभाळणं अनेकदा कठीण जातं. आपलं लक्ष काही सेकंदांसाठी मुलांवर नसेल, तर ही लहान मुलं काहीतरी गोंधळ नक्कीच घालून ठेवतात आणि पालकांनासुद्धा टेन्शनमध्ये टाकतात. तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. आईसोबत असताना चिमुकल्याच्या घशात चॉकलेट अडकतं आणि आईची तारांबळ उडते
चॉकलेट, गोळ्या, च्युईंगम यांसारखे पदार्थ चिकट असल्यानं ते चावून खाणं कठीण असतं. त्यामुळेच असे पदार्थ घशात अडकण्याचा धोका वाढतो. व्हायरल व्हिडीओतील लहान मुलासोबतसुद्धा असंच काहीसं झालं. व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, आई तिच्या लहान मुलाला कडेवर घेऊन त्याच्याशी संवाद साधत असते. तो चिमुकलाही मजेत चॉकलेट खाताना दिसत आहे. बघता बघता अचानक चिमुकल्याच्या घशात चॉकलेट अडकतं आणि त्याला त्रास होण्यास सुरुवात होते. हे पाहून आईला काहीच सुचत नाही आणि ती इतरांकडे मदत मागत आरडाओरड करताना दिसून येत आहे. तर, अनेक जण चिमुकल्याला मदत करण्यास धावून येतात. अशातच परिस्थिती पाहून, एक जोडपं तिथे येतं आणि त्यातील महिला चिमकुल्याची मदत करताना दिसून येत आहे.आणि काही क्षणांतच मुलाच्या घशात अडकलेलं चॉकलेट मिनिटांत बाहेर पडतं. हे पाहून मुलाची आई भावूक होते आणि अज्ञात महिलेला लगेचच मिठी मारते. चिमुकल्याच्या संकटकाळात अज्ञात महिलेनं कशा प्रकारे मदत केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
अज्ञात महिला आली चिमुकल्यासाठी धावून :
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका पाच वर्षांच्या मुलाचा आहे. आई सोबत असताना मुलाच्या घशात नकळत चॉकलेट अडकतं आणि त्याच्या मदतीला एक अज्ञात महिला धावून येते. अज्ञात महिला तिच्या पद्धतीनं प्रयत्न करते आणि यशस्वीरीत्या चिमुकल्याच्या घशात अडकलेलं चॉकलेट बाहेर काढते. हे पाहून चिमुकल्याची आई मुलाला जवळ घेण्याआधी, संकटातून बाहेर काढणाऱ्या महिलेला मिठी मारते हे पाहून तुम्हीसुद्धा काही क्षणांसाठी भावूक व्हाल.
सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडीओ @goodnewsmovment या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून, एक युजर म्हणत आहे, “अनेकदा आपल्या लहान मुलांना अशा अवस्थेत पाहून पालक गोंधळून जातात.” तसेच काही जण अज्ञात महिलेचं कौतुक करताना दिसून आले आहेत. तर काही पालक त्यांच्या मुलांसोबत घडलेल्या अशा अनेक घटना कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.