Viral video: चोरी करताना चोरटे अगदी नियोजन आखून चोरी करतात, असे म्हटले जाते. कारण- चोरी करताना तो पकडला जाण्याची त्याला भीती असते. तसे झाल्यास आधी सार्वजनिक ठिकाणी असलेले लोक चोराला पकडून मारतात आणि मग पोलिसांच्या ताब्यात देतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका बस चालकाच्या हुशारीमुळे चोरांना पकडायला मदत झालीय. बस चालकाची चोराला पकडण्याची फिल्मी स्टाईल पाहून तुम्हीसुद्धा चकित व्हाल. याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज पाहायला मिळतात, जे आश्चर्यकारक असतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जे पाहून तुम्ही त्या व्यक्तीचं कौतुक केल्याशिवाय राहाणार नाही.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Accident of a man caught between two buses and crushed terrfying video viral on social media
याला म्हणतात नशीब! दोन मोठ्या बसमध्ये अडकला अन् चिरडला; पण पुढच्याच क्षणी चमत्कार झाला, पाहा थरारक VIDEO
pune viral video man break all traffic rules
पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन चोर गाडीवरुन आले आणि एका महिलेच्या गळ्यातील चैन खेचण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी त्याचा एक सहकारी गाडीवर उभा आहे, चोरी करुन पळून जाण्याच्या प्लॅनमध्ये चोरटे होते. मात्र त्यांचा हा प्लॅन बस चालकानं हाणून पाडला. बस चालकाच्या लांबूनच हा सगळा प्रकार लक्षात येताच त्यानं थेट बस या चोरट्यांच्या अंगावर घातली. यामध्ये हो दोघेही चोर गाडीसकट खाली पडले आणि पळू लागले, यावेळी आजूबाजूचे लोक त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे पळाले. बस चालकाच्या हुशारीमुळे चोरांचा हा डाव फसलेला पाहायला मिळाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत होता; तेवढ्यात बाईकचा गेला तोल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

फिल्मी स्टाईलमध्ये पकडले चोराला

चित्रपटात अनेकदा आपण पाहिले असेल की, चोराला पकडण्यासाठी हीरो जीवाचे रान करतो तो उंच इमारती किंवा गाड्यांवरून उड्या घेऊन चोराला पकडतो. असंच काहीसं या व्हिडीओतसुद्धा पाहायला मिळालं आहे. या बसचालकाने एकदम फिल्मी स्टाईलनं या चोराला पडकण्यासाठी प्रयत्न केला. बस चालकाने चोराला पकडण्यासाठी दाखवलेली हिंमत अगदीच कौतुकास्पद आहे.

सोशल मीडियावरही हा व्हिडीओ @roberyfail या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण बस चालकाच्या हिमतीचं कौतुक करीत आहेत.

Story img Loader