Viral Video :- अनेकदा सोशल मीडियावर महिलांच्या भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही भांडणं ही ट्रेनमधील सीटवर बसण्यावरून; तर काही क्षुल्लक कारणांवरून झालेली असतात. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक महिला तीन अनोळखी महिलांशी भांडताना दिसतेय आणि भांडता भांडता ती अन्य तीन महिलांना हाताने व पायाने मारताना दिसत आहे.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ चंदिगडचा आहे. चंदिगडच्या रस्त्यावर एक महिला तीन अज्ञात महिलांशी भांडताना दिसून आली. प्रकरण असं आहे की, एक महिला चुकीच्या दिशेनं गाडी चालवत होती आणि सरळ दिशेनं येणाऱ्या गाडीला चुकून तिच्या गाडीची टक्कर लागली असती. याचदरम्यान सरळ रस्त्यानं येणाऱ्या अज्ञात महिलांनी चुकीच्या दिशेनं जाणाऱ्या महिलेला थांबवून तिला सरळ रस्त्यानं गाडी नेण्याचा सल्ला दिला. हे ऐकताच ती महिला भडकली ती तिला थांबवणाऱ्या त्या महिलांशी वाद घालू लागली आणि हात व पायानं तीन महिलांना मारताना दिसून आली. चुकीच्या दिशेनं गाडी चालवणाऱ्या महिलेला अडवल्यानं हे भांडण रस्त्यावर सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हे प्रकरण जी व्यक्ती मोबाईलमध्ये शूट करीत आहे, ती वाद घालणाऱ्या महिलेला थांबवण्याचा प्रयन्त करीत आहे. पण, ही महिला व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला हातवारे करून त्यालाच रोखण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसून येत आहे.
हेही वाचा :- “मला नवऱ्याकडे जायचंय पण त्याची बायको..” लेकासह भारतात आलेल्या बांगलादेशी सोनियाची तक्रार ऐकून पोलीस थक्क
व्हिडीओ नक्की बघा :-
तसेच व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, भांडणादरम्यान रस्त्यावर लोकांची एकच गर्दी दिसत होती. हे प्रकरण बघता, यातील काही जणांनी या घटनेची सूचना पोलिसांना दिली. आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी येऊन प्रकरण हाताळले. त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी तुम्ही बघू शकता की, अज्ञात तीन महिलांना मारणारी आणि वाद घालणारी महिला हात जोडून माफी मागताना दिसली. हा व्हिडीओ (Tabish khan) या युजरच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओच्या कमेंटमध्ये अनेक जण या मुद्द्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.