कुटुंबाबरोबर गावी किंवा इतर ठिकाणी फिरायला जाताना सामानाबरोबर घरी बनवलेल्या खाद्यपदार्थांचा डब्बा आपण आवर्जून घेऊन जातो. कारण लांबच्या प्रवासात अनेकदा भूक लागते आणि बाहेरचे खाण्यापेक्षा घरचं जेवण आरोग्यासाठीही चांगले असते. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे. व्हिडीओमध्ये सहा जणांचे कुटुंब ट्रेन प्रवास करताना दिवसभर आणि रात्री अनेक घरगुती पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुटुंब ट्रेनमधून प्रवास करत आहेत. लांबच्या प्रवासादरम्यान संपूर्ण व्हिडीओमध्ये हे कुटुंब अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या खाद्यपदार्थांमध्ये सँडविच, सरबत, पेरू, खाकरा, केळी, कोल्ड्रिंक्स, चिप्स पॅकेटचा समावेश तर आहेच; पण रात्रीच्या जेवणासाठी पुरी भाजीसुद्धा त्यांनी डब्यातून आणली आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं नक्की. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…आले रे आले… मुंबई पोलिसांच्या दमदार कामगिरीची गाण्याद्वारे दाखवली झलक; VIDEO ने जिंकलं नेटकऱ्यांचं मन
व्हिडीओ नक्की बघा :
प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणारे अनेक विक्रेते तुम्हाला दिसतात. पण, बाहेरचे खाद्यपदार्थ टाळून या कुटुंबाने घरातून सर्व पदार्थ खाण्यासाठी आणले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विंडोसीट जवळ कुटुंबातील दोन महिला बसल्या आहेत. त्यांनी वर्तमानपत्र सीटवर ठेवून त्यावर ब्रेड ठेवून सँडविच बनवताना दिसत आहेत. या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी पेपर ग्लास, पत्रावळ्या (डिस्पोजेबल प्लेट्स), चमचे आदी अनेक आवश्यक गोष्टी त्यांनी बरोबर आणल्या आहेत आणि या वस्तू फेकून देण्यासाठी कचऱ्याची पिशवीसुद्धा आणली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @neelam_rathi_chandak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवले आहेत, तर काही नेटकरी ट्रेनला घर बनवलं अशा अनेक मजेशीर कमेंट, तर कुटुंबाच्या स्वच्छतेचेही कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.