Viral Video :- भारताची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित आहे. शेतकरी शेतात दिवस-रात्र राबतो. शेताच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तो काम करतो. ग्राहकांना आणि इतर व्यवसायांना ते विकण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या सगळ्यात तो डिझेलच्या वाढत्या किमती, विजेचा अपुरा पुरवठा, शेतीसाठी पाण्याची सोय या सगळ्या समस्यांचा सामना करीत असतो. पण काही शेतकरी असे असतात की, जे या समस्या त्यांच्या युक्तीने सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. आज व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळालं. एका शेतकऱ्यानं वेळ वाचवण्यासाठी आणि त्याचा फायदा होण्यासाठी एक तगडा उपाय शोधून काढला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सेटअप शेतात तयार करण्यात आला आहे आणि त्यात बॅटरी व काही गरजेच्या गोष्टींची व्यवस्था केलेली पाहायला मिळत आहे. पाण्याच्या पंपाच्या बाजूला जमीन खोदून नळ जोडला आहे. आणि विशेष म्हणजे एका बोर्डला छोटे छोटे बल्ब लावण्यात आले आहेत. तर काही वेळाने व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चाक फिरवते आणि मग नळातून पाणी वेगाने बाहेर येऊ लागते. तुम्ही पाहू शकता की, विजेशिवाय अशा पद्धतीने हा पंप चालू करण्यात आला आहे. शेतकऱ्याचा हा जुगाड अनेकांना विचार करायला भाग पाडणारा आहे. शेतीसाठी पाण्याची व्यवस्था असणे खूप गरजेचे आहे. शेतात पाणी घेऊन जाताना मशीनला पेट्रोल आणि डिझेलची गरज लागते; पण पेट्रोल आणि डिझेल महाग असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतो. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकते. पण, सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे की, शेतकरीराजाने युक्ती लावून त्याच्या समस्येचे निवारण अगदी यशस्वीरीत्या केले आहे.
हेही वाचा :- बापाचं काळीज; लेकाची हौस पूर्ण करण्यासाठी आणली सायकल, हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :-
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ आयआरएस (IRS) अधिकारी सुग्रीव मीना यांनी शेअर केला आहे. आणि कॅप्शन लिहिलीय की, विजेशिवाय १० एचपी कृषी पंप सुरू करण्यात आला. शेतकरीराजाची युक्ती पाहून अनेकांनी या व्हिडीओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये शेतकऱ्याचे कौतुक केले आहे आणि व्हिडीओ पाहून शेतकऱ्याला हा उपाय कसा सुचला असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या युक्तीमुळे शेतकऱ्याचा वेळ वाचेल आणि खर्च कमी होईल,असे म्हणायला हरकत नाही.