Viral Video :-वाहनचालकांना अनेक गोष्टींची खबरदारी घेऊन गाडी चालवावी लागते. रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांना, प्राण्यांना बघून, गाडीवरील नियंत्रण सुटू न देता, कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अशातच कधी कधी वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे समोरच्याचा किंवा त्याचा स्वतःचा जीव धोक्यात येण्याचीही शक्यता असते. तर असंच काहीसं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. बाजारात रिक्षाचालक दोन बैलांमधील भांडण सोडवायला जातो आणि स्वतःच वाईट अवस्थेत फसतो.

हा व्हिडीओ एखाद्या बाजारपेठेतील आहे, असं दिसतं आहे. अनेक दुकानं आणि माणसाची रहदारी व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन बैल रस्त्याच्या मधोमध झुंजीसाठी एकमेकांसमोर उभे आहेत. काही जण लांबूनच त्यांना काठी मारताना दिसत आहेत. बैलांचं भांडण चालू असताना हुशारांतील हुशार व्यक्तीही त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते. कारण- बैल भांडणाच्या वेळेस नकळतपणे आजूबाजूच्या परिसर व्यापून टाकतात. तसेच यादरम्यान कधी कोणाला इजा होईल याचासुद्धा काही नेम नसतो.

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Locals Saved Me Foreigner Argues With Delhi Rickshaw Puller Over Fare
Video : ‘या लोकांमुळे भारतीयांचे नाव खराब होते’, पर्यटकाला लुटण्याचा रिक्षाचालकाचा प्रयत्न; ‘१५०० रुपये दे’ म्हणत परदेशी व्यक्तीच्या मागेच लागला शेवटी…

आ बैल मुझे मार..

या व्हिडीओत बैलांचं भांडण सुरू असताना अचानक एक रिक्षावाला त्याची रिक्षा रिव्हर्समध्ये घेऊन येतो आणि बैलांची झुंज सोडवण्याचा प्रयत्न करतो. रिक्षाने टक्कर मारताच बैल एकमेकांपासून वेगळे होतात आणि त्यातला एक बैल रिक्षाला धडक देतो. रिक्षाचालकासोबत ती रिक्षाही रस्त्यावर उलटी पडते. बैल रिक्षाला टक्कर मारून तिथून पळ काढतो. आजूबाजूला उभी असलेली माणसं रिक्षा व रिक्षाचालकाच्या मदतीला धावून जातात. अशातच बैलांचं ‘भांडण तर मिटलं’; पण रिक्षाचालकान ते भांडण सोडवायला जाऊन स्वत:च्या पायावर ‘कुऱ्हाड मारून घेतली’, असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा :- माणुसकी अन् कर्तव्यदक्षता! रस्ता ओलांडताना जखमी झाली महिला, पोलिस कॉन्स्टेबल मदतीला आला धावून; मुंबई पोलिसांचे ट्विट व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :-

सोशल मिडिआ ॲप इन्स्टाग्रामच्या (appuvideoes96gmail.comb) या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. एक जण म्हणतोय की, दोन जणांच्या भांडणात जेव्हा तिसरी व्यक्ती जाते, तेव्हा नेहमी असंच होतं. तर दुसरी व्यक्ती म्हणतेय रिक्षाचालक उगीच हीरो बनायला गेला. अशा अनेक मजेशीर कमेंट व्हिडीओखाली तुम्हाला पाहायला मिळतील.

Story img Loader