Viral Video :- लहान मुलींची खेळण्यांतील आवडती गोष्ट म्हणजे बाहुली. पारंपरिक, तसेच पाश्चिमात्य पोशाख परिधान केलेल्या अशा अनेक वेगवेगळ्या बाहुल्यांचे प्रकार बाजारात तुम्ही पाहिले असतीलच. पण, तुम्ही कधी या बाहुल्या कशा बनवल्या जातात हे बघितलं आहे का? …
तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, बाहुल्या कशा प्रकारे तयार करण्यात येतात. प्लास्टिकच्या या बाहुल्या लहान स्थानिक कारखान्यांत बनवल्या जातात. सुरुवातीला गुलाबी रंगाचा द्रव पदार्थ एका भांड्यात ओतून, तो पाण्यात ठेवला जातो. त्यानंतर विविध साच्यांच्या मदतीने बाहुलीच्या वेगवेगळ्या अवयवांना आकार दिला जातो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की, यंत्राद्वारे बाहुलीच्या डोक्यावर प्लास्टिकचे केस कसे शिवले जातात.त्यानंतर एक-एक करून बाहुलीच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडले जाते आणि मग छान छान कपडे व बूट घालून अगदी सुंदररीत्या बाहुली तयार होते. या बाहुल्यांना नंतर प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते.
हेही वाचा :- जुगाडू काकांनी पावसाळ्यात शोधली श्रीमंत व्हायची युक्ती! ग्राहकांनीही घेतलं डोक्यावर, पण मग टीका का होतेय?
नक्की बघा व्हिडिओ :-
सोशल मीडिया ॲप इन्स्टाग्रामवरील कोलकत्ता रिव्ह्यू स्टार (Kolkata review star) या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अलीफ मिद्या हा इन्स्टाग्रामवरील एका फेमस ब्लॉगर आहे. हा फेमस ब्लॉगर असे अनेक विशिष्ट व्हिडीओ पोस्ट करीत असतो. कारखान्यात बाहुल्या कशा बनवतात हे पाहिल्यावर अनेक नेटकरी व्हिडीओच्या कमेंटमध्ये विविध भावना व्यक्त करताना दिसत आहेत. आकर्षक दिसणाऱ्या या बाहुल्या स्वयंचलित यंत्राच्या साह्याने बनवल्या जातात हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल हे नक्की.