lives Of Girls In Danger In The Fight Between Two Bulls: मानवी वस्तीत प्राणी दिसणं आता सामान्य झालं आहे. काही भटके, पाळीव प्राणी अन्नपाण्याच्या शोधात, तर जंगलतोड केल्यामुळे अनेक जंगलातील प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करताना दिसतात. जंगलातील प्राण्यांचे ठीक आहे, पण भटके किंवा पाळीव प्राणी म्हणजेच गाय, बैल यांना सांभाळणाऱ्या त्यांच्या मालकांनी त्यांच्याबरोबर राहायला हवं किंवा त्यांना दोरीने बांधून तरी ठेवायला हवं. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये रस्त्यावर दोन भांडण करणारे बैल मार्केटमधील एका दुकानात शिरले आहेत. तसेच या बैलांमुळे दोन मुलींचा जीव धोक्यात आल्याचे पाहायला मिळालं आहे. नेमकं काय घडलं लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
व्हायरल व्हिडीओ ऋषिकेशचा आहे. ऋषिकेशच्या राम झुला भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. एका दुकानात बॅग खरेदी करण्यासाठी दोन तरुणी आल्या होत्या. तेवढ्यात रस्त्यावर दोन भांडण करणारे बैल त्या बॅगच्या दुकानात शिरतात. बैलांना पाहून त्या छोट्याश्या दुकानात मागे सरकण्यासाठी त्या मुली सुरुवात करतात. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यातील एक तरुणी बॅग ठेवण्यात आलेल्या टेबलवर चढण्यास सुरुवात करते. तरुणीच्या जवळ असणाऱ्या बैलाने हे पाहिले आणि चिडलेल्या बैलाने लाथा मारण्यास सुरुवात केली. यादरम्यान टेबलावर ठेवलेल्या बॅग मुलींच्या अंगावर पडल्या. नेमकं काय घडलं व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…‘एक रील लाखो…’ दुचाकी चालवताना Reel बनवताय? मग ‘हा’ VIDEO बघा; पोलिसांनी दिला मोलाचा सल्ला
व्हिडीओ नक्की बघा…
दुकानदार असा आला मदतीला :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बैलांपासून संरक्षण करण्यासाठी दोघींपैकी एक तरुणी बॅग ठेवण्यात आलेल्या टेबलवर चढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे बैल चिडतो आणि तरुणींना लाथा मारण्यास सुरुवात करतो. यादरम्यान टेबलावर असणाऱ्या बॅग मुलींच्या अंगावर पडतात, त्यामुळे बैलाच्या लाथांपासून त्यांचे संरक्षण होते. पण, एकीला थोडी दुखापत होते. काही वेळाने दुकानदार तेथे आला आणि काठीचा वापर करून त्याने बैलांना दुकानाबाहेर काढले.
दोन मुली बैलांमुळे दुकानात कशा अडकल्या ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाली आहे; जी @NAINAYADAV_06 या युजरच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. येथील नागरिकांनी भटक्या जनावरांचा प्रश्न अनेकदा प्रशासनाकडे मांडला, पण तरीही नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. हा व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘बिचाऱ्या मुली आता कधीच कोणत्या दुकानात जाणार नाहीत.’ तर दुसऱ्याने कमेंट केली की, ‘हे खूपचं भयानक आहे.’