Viral Video : अनेकदा सर्वांनी पाहिलं असेल की, लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा कोणताही विशिष्ट कार्यक्रम मनोरंजनासाठी एक हमखास कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तो म्हणजे जादूचा शो (Magic Show). आणि ही जादू करून दाखवतो तो लहान मुलांचा लाडका जादूगार. जादूगाराच्या जादूचे भन्नाट खेळ लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच चकित करून सोडतात. पण, या जादूगाराच्या जादू करण्याच्या ट्रिक्स तुम्हाला माहिती झाल्या तर?तर आज आपण ही जादू नेमकी कशी केली जाते याची झलक व्हायरल व्हिडीओतून पाहणार आहोत.
सध्या एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होताना दिसत आहे; ज्यात दोन मित्रांची जुगलबंदी चालू आहे. ही जुगलबंदी खेळ, डान्स या सगळ्यांशी निगडित नसून ती जादूशी संबंधित आहे. या गमतीशीर व्हिडीओमधून तुम्ही जादूच्या अनेक ट्रिक्ससुद्धा शिकू शकता. पण गंमत अशी आहे की, या व्हिडीओमध्ये मिनिटा-मिनिटाला ट्विस्ट आहेत. कारण- जादूगारचा मित्र आपल्या मित्राची पोलखोल करताना दिसत आहे. व्हिडीओत पुढे बसलेला पहिला मित्र जसजशी एक-एक जादू करून दाखवत आहे, तसतसा व्हिडीओमध्ये मागे बसलेला दुसरा मित्र त्याच्या जादूचे गुपित नेटकऱ्यांसमोर उघड करताना दिसत आहे. गंमत अशी की, या पोलखोलनंतर जादूगाराचे हावभाव अगदी बघण्यासारखे होतात. ते बघून तुम्हाला पोट धरून हसायला येईल. तीन मिनिटांचा हा व्हिडीओ तुम्हालाही चकित करून सोडेल. या जादूगाराच्या जादूचे अनोखे प्रकार आणि त्याच्या मित्राने केलेली पोलखोल या व्हिडीओमधून तुम्ही एकदा पाहाच…
नक्की पहा हा व्हिडीओ :- https://twitter.com/NoContextHumans/status/1686991109149306881?t=UJtFn2iWRKg5DPecYl4OHw&s=19
हेही वाचा :- नवऱ्याला दुसऱ्या तरुणीसोबत बंद कारमध्ये बायकोने रंगेहात पकडले; हायव्होल्टेज ड्रामा अन्…VIDEO व्हायरल
तुम्ही या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, जादूगर त्याच्यासमोरील ग्लास रुमालाने झाकून त्यातील पाण्याचा रंग बदलतो. पण, या व्हिडीओमध्ये मागे बसलेला मित्र ग्लासमधला लाल रंगाचा कपडा काढून त्या जादूचे गुपित सगळ्यांसमोर आणतो. जसा व्हिडीओ हळूहळू पुढे जातो तसे आपल्याला दिसते की, जादूगार एका रिकामी खाकी बॅगमधून दोन वेगवेगळ्या छोट्या वस्तू काढून दाखवतो. ते बघताच मागे बसलेला मित्र त्याने ते आधीच फोल्ड करून वस्तू कशा लपवल्या होत्या हे सत्य समोर आणतो. असे जादूचे अनेक प्रकार या व्हिडीओमध्ये अगदी गमतीशीररीत्या उघड करून दाखवले आहेत. जे तुम्ही खूपदा अनेक कार्यक्रमांत किंवा अनेक व्हिडीओमध्ये पाहिले असतीलच. हा व्हिडीओ (Out Of Context Human Race) आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ह्युमन रेस या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत.