पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो सध्या खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिडर यांची मुलगी आशना लिडरचा आहे. ज्यामध्ये आशना लिडर एक कविता वाचताना दिसत आहे. ही कविता आशना लिडर यांनी स्वतः लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तमिळनाडूमधील कुन्नूरजवळ ८ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात आशना लिडरच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमधील १४ जणांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला.

किरण बेदी यांचे ट्विट

किरण बेदी यांनी ट्विट केले की ही कविता आशना लिडर (स्वर्गीय ब्रिगेडियर लिडर यांची मुलगी, ज्यांना हेलिकॉप्टर अपघातात आपला जीव गमवावा लागला) यांची आहे. ३ डिसेंबरच्या शुक्रवारच्या पुस्तक वाचन सत्रात तिने स्वतःच्या पुस्तकातून ते वाचून दाखवले. आयुष्य खूप रहस्यमय आहे.

( हे ही वाचा: Viral Video: कालव्याच्या काठावर उभं राहून ही तरुणी घेत होती सेल्फी, आणि मग… )

आशना लिडरची खास कविता

व्हिडीओमध्ये आशना लिडर म्हणाली की, मी स्वातंत्र्य दिनानिमित्त लिहिलेली माझी एक कविता वाचणार आहे आणि त्याला निस्वार्थ स्वातंत्र्य म्हणता येईल. किती निस्वार्थ स्वातंत्र्य आहे हे. एखाद्या राष्ट्रासाठी आणि इतर लोकांच्या फायद्यासाठी लोक स्वत: चा आणि आपल्या जीवनाचा त्याग करण्यास तयार कसे होतात, जरी त्यांना यासाठी निश्चितपणे सन्मानित केले जाणार की नाही हे माहित नसत.

या कवितेसाठी पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी आणि इतर आशना लिडरचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे. ब्रिगेडियर एल.एस.लिडर यांची कन्या आशना लिडर हिने अपूर्ण कुटुंबावर आपली कविता वाचली. आशना लिडर यांनी आपल्या कवितेत राष्ट्रासाठी अपूर्ण कुटुंबाच्या बलिदानाचा उल्लेख केला आहे.

( हे ही वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ शहरात १० हजार रुपये लिटरने विकले जात आहे गाढवाचे दूध, खरेदी करणाऱ्यांची लागलीये लाइन )

( हे ही वाचा: नवीन वर्षात या ४ राशींवर राहील लक्ष्मीची कृपा, व्यवसाय असो किंवा नोकरी, सर्वत्र मिळेल यश )

पुस्तकाच्या मागणीत वाढ

आशना लिडरचे हे पुस्तक गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात लाँच करण्यात आले. या कार्यक्रमाला आशना लिडरचे पालक, किरण बेदी आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत उपस्थित होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातानंतर आशना लिडर यांच्या पुस्तकाच्या मागणीत वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incomplete family poem recited by lakhwinder singh lidder brigadiers daughter before the helicopter crash video viral ttg