सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी वाघ, सिंह एखाद्या हरणाची शिकार करताना दिसतात तर कधी आकाशात उडणारे गिधाड जमिनीवरील प्राण्याची शिकार करताना दिसते. सध्या एका गरुडाचा मासे पकडतानाचा एक अविश्वसनीय व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मार्क स्मिथ, एक प्रशंसनीय छायाचित्रकार, त्याने कॅमेरात आश्चर्यकारक क्षण कॅप्चर केला आणि तो इंस्टाग्रामवर शेअर केला. इंस्टाग्रामवर १ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेले मार्क स्मिथ स्वत:ला छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर आणि कथाकार म्हणून वर्णन करतात .पाण्यातील मासा पकडणाऱ्या गरुडाचा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक झाला आहे. या व्हिडीओ १२४ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, आकाशात उंच उडणारे गरूड हळू हळू समुद्रातील पाण्याच्या जवळ येते. पुढच्याक्षणी पाण्यात पोहणाऱ्या माश्यावर झटप घालून आपल्या पायात पकडते पुन्हा आकाशात झेपावते. एवढंच नाही तर उडता उडताच पायात पकडलेला मासा पुन्हा चोचीमध्ये पकडतो आणि त्यावर ताव मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये आहे त्यामुळे व्हिडीओ पाहण्याची मज्जा काही वेगळीच आहे. एका शब्दात सांगायचे तर हा व्हिडीओ अविश्वसनीय आहे.
हेही वाचा- दोन माकडांचा अंगणात बसलेल्या महिलेवर हल्ला, केस ओढून….थरारक घटनेचा Video Viral
मार्क स्मिथने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी निशब्द झालो आहे याशिवाय मी काय बोलू समजत नाहीये” नेटकऱ्यांनी मार्क स्मिथचे हा सुंदर क्षण कॅमेरात कैद केल्याबद्दल कौतुक केले. “तुम्ही हा अविश्वसनीय क्षण कॅप्चर करू शकलात ही वस्तुस्थिती,” असे एकाने सांगितले.
इतर अनेकांनी या परिस्थितीवर आश्चर्य व्यक्त केले: “गरुड पक्ष्याने उडताना पंज्यामधून निसटणाऱ्या माशाला त्याच्या चोचीने हे छोटेसे झटके देत ज्या पद्धतीने पकडले त्यासाठी खूप कौशल्य लागते. गरुडाचे कौशल्य पातळी आश्चर्यकारक आहे!”
तिसरा म्हणाला “हा पक्षी विजय मिळवूनही चिडलेला दिसत आहेत.”