क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल मोठ्या प्रमाणात उत्साह अन् उत्सुकता आहे. अशात पंजाबमधील एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एका लग्न समारंभात क्रिकेटची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत एका शाही लग्नसोहळ्यात पाहुणे चक्क भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानची लाइव्ह मॅच पाहत असल्याचे दिसत आहेत. इतकेच नाही तर पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी डीजेवर गाणीदेखील सुरू आहेत. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांमध्येही क्रिकेटचा फिवर पाहायला मिळाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्नसोहळ्याच्या हॉलमध्ये एकीकडे लग्नविधी सोहळा सुरू आहे; तर दुसरीकडे आलेले अनेक पाहुणे भारत – ऑस्ट्रेलिया सामना बघण्यात व्यग्र आहेत. या पाहुण्यांसाठी हॉलच्या एन्ट्री गेटजवळ एक भलीमोठी स्क्रीन लावली होती. यावेळी स्क्रीनवर लाइव्ह क्रिकेट सामना सुरू आहे; तर दुसऱ्या बाजूला डीजेवर गाणी वाजत आहेत. त्यामुळे लग्नसमारंभासाठी आलेले पाहुणे मोठ्या स्क्रीनवर लाइव्ह मॅचचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यामुळे या हटके लग्नसोहळ्याची आता खूप चर्चा होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ @Gagan4344 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. त्यात अनेकांचे असेच मत आहे की, या वधू-वरांनी लग्नासाठी चुकीची तारीख निवडली.