World Cup 2023 Final Special Train: सध्या संपूर्ण देशात आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ (World Coup 2023 Final Match) ची धूम पाहायला मिळतेय. भारताने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, त्यामुळे संपूर्ण देश आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रविवारी (१९ नोव्हेंबर) होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा अंतिम सामना होणार असून तो गुजरातच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने स्टेडियमवर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते अहमदाबाददरम्यान विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) वर या ट्रेनसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
CWC 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! अहमदाबादसाठी चालवली जाणार ‘वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन’; पाहा ट्रेनचं वेळापत्रक
Cricket World Cup Special Train : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबरला होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-11-2023 at 18:36 IST
TOPICSआयसीसीICCआयसीसी विश्वचषक २०२३ICC World Cupऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमAustralia Cricket Teamक्रिकेटCricketक्रिकेट ऑस्ट्रेलियाCricket Australiaक्रिकेट न्यूजCricket Newsक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाInd vs Ausविश्वचषक २०२३World Cup
+ 5 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus final cricket world cup 2023 final indian central railway will run cricket world cup special train from csmt to ahmedabad sjr