T20 World Cup IND vs NED Highlight: टी २० विश्वचषक सामन्यात नेदरलँडला हरवून भारताने आपला दुसरा सामनाही यशस्वीरित्या जिंकला आहे. १८० धावांचे मोठे टार्गेट पूर्ण करताना नेदर्लंडच्या संघाची सुरुवातच वाईट झाली होती अशातच भारतीय संघाच्या गोलंदाजांनीही आपला दमदार खेळ दाखवून ५६ धावांनी विजय मिळवला. इथे भारतीय संघाला दुसरा विजय मिळताच तिथे टीम इंडियाच्या चाहत्यालाही आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण अनुभवता आला. टीम इंडियाच्या एका चाहत्याने या सामन्यात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत विरुद्ध नेदरलँड सामना सुरु असताना हा टीम इंडियाचा फॅन आपल्या वेगळ्याच खेळात जिंकला, अशा मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

आयसीसीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. अलीकडे क्रिकेटच्या सामन्यात प्रपोज करण्याचे फॅड कमाल ट्रेंडिंग आहे. याच ट्रेंडमधून आता भारतीय संघाच्या चाहत्यालाही आपले प्रेम मिळाले आहे. या जोडप्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील असा हा क्षण तुम्हीही पाहा…

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे तर भारताने १८० धावांचे आव्हान नेदरलँडसमोर ठेवले होते. टी २० सामन्यांमधील टॉपचा संघ असणाऱ्या भारतासमोर नेदर्लंडचा फार निभाव लागू शकला नाही. २० षटकात ९ गडी बाद करून भारतीय संघाने १२३ धावांवरच नेदरलँडच्या फलंदाजांना रोखून धरले. भारतीय संघाने आजच्या सामन्यात केवळ फलंदाजीचा नव्हे तर गोलंदाजीतही आपली कमाल दाखवून दिली. पहिला वहिला विश्वचषक खेळणाऱ्या अर्शदीप सिंग व अक्सर पटेल सारख्या खेळाडूंनी नेदर्लंडच्या खेळाडूंना एका पाठोपाठ एक करत तंबूत धाडले होते.

IND vs NED: “मी मैदानात येताच कोहली भाऊ.. ” सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित

भारतीय संघाने फलंदाजीतही अत्यंत आक्रमक खेळ दाखवला. के एल राहुल स्वस्तात आउट झाल्यावर रोहित शर्मा, विराट कोहली व सामनावीर सूर्यकुमार यादव याने भारताला १७९ धावांचे मोठे टार्गेट उभे करण्यास मदत केली. विराट व सूर्यकुमार यादवने विक्रमी अर्धशतक या सामन्यात खास ठरले. भारताचा पुढचा सामना हा ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध रंगणार आहे.

Story img Loader