IND vs NZ Champions Trophy Final 2025 memes: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिली बॅटिंग करून २५१ धावा केल्या आहेत. अन् आता भारतीय फलंदाज या आव्हानाचा पाठलाग करत आहेत. दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील हा दुसरा अंतिम सामना आहे. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० चा अंतिम सामनाही भारत आणि न्यूझीलंडमध्ये झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने चार विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारतीय गोलंदाजांनी इतका भेदक मारा केला होता की न्यूझीलंडची टीम धड २०० धावा सुद्धा करू शकली नसती. पण फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरनं रचिन रविंद्रची कॅच सोडून गोंधळ घातला.

रचिननं वरूण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर षटकार मारण्याच्या नादात बॉल उंच भिरकावला. पण तो बॉल बाऊंड्रीलाईनवर जाऊन पडला. दरम्यान श्रेयसकडे कॅच पकडण्याची संधी होती. पण तो बॉल त्याच्या हातून सटकला आणि रविंद्रची विकेट जाता जाता वाचली. अर्थात अर्थात रविंद्रनं त्यानंतर फारकाही केलं नाही. सुदैवानं तो कुलदीप यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. पण रविंद्रच्या या सुटलेल्या कॅचवर काही मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

विराट कोहलीली पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित होती. यावेळी श्रेयसने कॅच सोडली अन् त्यावरअनुष्काची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर लगेच पसरली.

सोशल मीडियावर फक्त अनष्का शर्माचीच रिअॅक्शन व्हायरल होत आहे असं नाही तर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ड्रॉप कॅचबद्दल मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.

भारतीय फॅन्स कॅच ड्रॉप झाल्यानंतर

श्रेयसकडे कॅच पकडण्याची संधी होती. पण तो बॉल त्याच्या हातून सटकला आणि रविंद्रची विकेट जाता जाता वाचली. अर्थात अर्थात रविंद्रनं त्यानंतर फारकाही केलं नाही. सुदैवानं तो कुलदीप यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला.

रवींद्रने २९ चेंडूत ३७ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १०.१ षटकांत २ बाद ६९ अशी मजल मारता आली.

Story img Loader