IND vs NZ, CWC 2023: १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या भारत आणि न्यूझीलंड या आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आकाश कोठारी असे आरोपीचे नाव असून तो मालाडचा रहिवासी आहे. त्याच्या राहत्या घरातून आकाशने हा काळाबाजार सुरु केला होता.

पोलिस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंडे यांच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना मुंबईत क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याने साहजिकच क्रिकेटप्रेमी हा सामना प्रफत्यक्ष बघण्यासाठी उत्सुक आहेत. पण याच उत्साहाचा गैरफायदा घेत आकाशने तिकिटांची किंमत साधारण ३५- ४० हजाराच्या दरम्यान सांगितली आहे. विशेष म्हणजे मूळ तिकीटाची किंमत ही फक्त अडीच (२,५००) हजार इतकीच आहे, पण आकाशने त्या वैध रक्कमेच्या चौदा पट मोठी रक्कम प्रेक्षकांकडून उकळली आहे.

Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?
Loksatta samorchya bakavarun Supreme Court Article Prohibition of conversion of places of worship
समोरच्या बाकावरून: हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे?
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
walking pneumonia incidence increasing in mumbai
विश्लेषण : मुंबईत ‘वॉकिंग न्युमोनिया’चा प्रादुर्भाव का वाढत आहे? लक्षणे काय? उपाय कोणते?
st corporation proposal for increase in bus fares
विश्लेषण : एसटी भाडेवाढ अटळ का? खिशाला किती फटका बसणार?
spiritual leader Chinmoy Das news in marathi
बांगलादेशात दास यांना दिलासा नाही; वकीलच मिळत नसल्याने जामिनावरील सुनावणी पुढील महिन्यात

पोलिसांनी आरोपींना कसे पकडले?

पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यातील पोलिसांचा समावेश असलेले एक पथक तयार केले होते. ही टीम मालाडमध्ये पोहोचली आणि कोठारीला पकडण्यात यश आले. तपासादरम्यान त्याच्याकडे काही मेसेज आणि काही कागदपत्रेही सापडली आहेत. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि ५११ (आजीवन कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा<< विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पद! शमी, बुमराह, जडेजालाही संघात स्थान, पण भारतीय चाहते नाराज कारण..

आरोपींनी सामन्याची तिकिटे कुठून आणली याचा अधिक तपास सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Story img Loader