IND vs PAK ICC Champions Trophy 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट प्रेमी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी त्यांच्या संघांमध्ये एक चुरशीचा सामना रंगणार आहे. हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबईतील ‘दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम’मध्ये हा सामना खेळत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यासंदर्भातील मीम्स आणि रिल्स व्हायरल होत आहे. अशाच एका मजेशीर व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी काही तरुणांनी ‘चक दे इंडिया’ गाण्याचे नव्याने तयार केले आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडिया जर्सी घातलेल्या तरुणांचा एक गट भारतीय क्रिकेट संघाच्या समर्थनात उत्साहीपणे हे गाणे गाताना दिसत आहे. अभिनेता शाहरूख खान याची मुख्य भूमिका असलेल्या बॉलीवूड चित्रपट चक दे इंडिया या चित्रपटातील गाणे या तरुणांनी नव्याने लिहिले आहे आणि त्याच गाण्याच्या चालीवर पुन्हा गायले आहे. या गाण्याचे नवीन बोल हे रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या भारतीय क्रिकेट दिग्गजांचे कौशल्याचे कौतुक केले आहे.
चक दे इंडिया गाण्याचे नवे बोल असे आहेत
रोहित के छक्को में,
कोहली के चौकों में,
कुलदीप की गुगली में
अक्षर की फिरक्की में
जड्डू की फिल्डिंग में,
राहूल की किपींग में
हर्षीत के गेंदों में,
शम्मी के विकटों में,
हां चॅम्पिअन तू बन ले
कप अपने नाम करले
हां चॅम्पिअन तू बन ले
कप अपने नाम कर ले
टस है ना मस है जी,
ज़िद है तो ज़िद है जी
किसना यूँ ही, पिसना यूँ ही, पिसना यूँ ही बस करिए..
चक दे हो चक दे इंडिया
चक दे हो चक दे इंडिया
चक दे हो चक दे इंडिया!
“चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समर्थन देण्यासाठी @indiancricketteam ला टॅग करा! हे विशेषतः आपल्या टीम इंडियनसाठी आहे. गर्जना करण्यासाठी सज्ज असलेला माणूस. तुमच्या क्रिकेट जोडीदाराला टॅग करा आणि एकत्र जयजयकार करा!” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
१६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहे. या व्हिडिओला संगीतकार सलीम मर्चंटसह अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कौतुकास्पद प्रतिसाद दिला. “चकदे इंडिया,” गायक-संगीतकाराने लिहिले.
“भारताचे इंटरनेट अशा प्रकारच्या कंटेंटसाठी बनवले गेले आहे,” असे एका वापरकर्त्याने लिहिले. “POV: पुरुष त्यांच्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी काहीही करू शकतात,” असे दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले. “या वर्षी ट्रॉफी भारतात येईल,” असे चौथ्या वापरकर्त्याने म्हटले.
दरम्यान, रविवारी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या त्यांच्या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला, ज्यामध्ये दुखापतग्रस्त फखर जमानच्या जागी सलामीवीर इमाम-उल-हकला खेळवण्यात आले.