विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध एकही मॅच न हरण्याचा विक्रम भारतीय संघाने कायम ठेवला. भारताने विश्वचषकामध्ये पाकिस्तानला हरवून, त्या देशाविरुद्ध दणदणीत अशा आठव्या विजयाची नोंद केलीय. या सामन्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून सोशल मीडियावर विविध माध्यमांतून त्यांचं कौतुक केलं जात आहे. क्रिकेटविश्वातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांना भारतीय क्रिकेट टीमनं नवरात्रीपूर्वीच मोठी भेट दिली. दरम्यान, याच वेळी प्रेक्षक आणि महिला पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. मॅच बघायला आलेल्या एका तरुणानं चक्क महिला पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं आहे. सर्वत्र निळाई पसरल्यासारखी दिसते आहे. यावेळी काही तरुण हुल्लडबाजी करताना आढळले असता, महिला पोलिस अधिकाऱ्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यांच्यातील एक तरुण महिला पोलिस अधिकाऱ्याला उलटं बोलू लागला. यावेळी महिला पोलिस अधिकाऱ्यानं तरुणाच्या कानाखाली लगावली. त्याच वेळी त्या तरुणानंही उलट हात करीत महिलेला मारलं. यावेळी आजूबाजूचे लोक तरुणाला थांबवू लागले.
स्टेडियममधला VIDEO होतोय व्हायरल
त्यानंतर व्हिडीओ थांबल्यामुळे पुढे नेमकं काय झालं याची माहिती मिळू शकलेली नाही. तरुणावर कारवाई झाली का, पुढे काय झालं, अशी विचारणा नेटकरी करीत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> क्यूट क्यूट म्हणत कुत्र्याला गोंजारणे पडले महागात; अक्षरशः महिलेच्या चेहऱ्याचे लचके तोडले, धक्कादायक VIDEO व्हायरल
विश्वचषकात खेळल्या गेलेल्या कालच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं धुवांधार फलंदाजी करीत ६३ चेंडूंत ८६ धावा ठोकल्या. भारताच्या या विजयानंतर ठिकठिकाणी नागरिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत होता. तेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.