विराट कोहली नेहमीच खेळाचा आनंद घेत असतो. तिसऱ्या दिवशी पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व राखले होते. त्यामुळे भारताचा कसोटी कर्णधार आनंदी मूडमध्ये दिसत होता. कोहली क्रीडांगणात वाजत असलेल्या गाण्यावर नाचतानाही दिसत होता.

कोहली नेहमीच चांगल्या उर्जेसह मैदानात उतरतो. खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांदरम्यान, कोहली काहीवेळा चाहत्यांशी संवाद साधतानाही दिसतो, त्यांना त्याच्या संघासाठी अधिक चिअर करण्यास सांगत असतो. इतर प्रसंगी तो संगीतावर किंवा ढोलाच्या आवाजावर नाचू लागतो.

(हे ही वाचा: बाबा वेंगाची भविष्यवाणी! २०२२मध्ये होणार एलियनचा अॅटक, येणार अनेक संकट)

(हे ही वाचा: दोन जेसीबींनी मिळून केला तिसर्‍यावर हल्ला, मजेदार व्हिडीओ सोशल मिडीयावर Viral)

दक्षिण आफ्रिकेचा संघ १७७ धावांवर सात विकेट गमावत असताना विराट कोहली मैदानावर नाचताना दिसला. सामन्यात भारताच्या मजबूत स्थितीमुळे तो मैदानावर एन्जॉय करताना दिसला. या सामन्यातील तीन दिवसांचा खेळ संपला आहे. यावेळी भारताकडे १४६ धावांची आघाडी आहे. यजमानांना किमान ३०० धावांचे लक्ष्य देऊन फलंदाजी करावी, अशी विराट कोहलीची इच्छा आहे. कोहलीच्या उत्स्फूर्त डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Story img Loader