Independence day 2023: शनिवार पासून सलग पाच दिवस सुट्टी आल्याने लोकांनी पर्यटनासाठी धाव घेतली आहे.स्वातंत्र्य दिनाला जोडून सलग सुट्ट्या आल्याने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार आहे. आज रविवार असल्याने अनेकजण मोठ्या संख्येने मुंबईबाहेर पडत आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जवळ आला आहे. अशातच सगळे सुट्टीसाठी प्लॅन करण्याच्या तयारीत आहेत. कारण यावेळी सुदैवाने सुट्ट्या फ्री-फोकसमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे सोमवारी सुट्टी मिळावी यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची धडपड सुरु आहे. जेणेकरून आपल्या मित्र-परिवाराबरोबर, कुटुंबीयांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करता येईल. यासाठी अनेकजणं आजारीही पडतायत. याचेच धम्माल आणि भन्नाट मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स नेमके कोणते पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वाधिक मेडिकल लिव्ह १४ ऑगस्ट रोजी पडणार आहेत, अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

हेही वाचा – VIDEO: छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? Msc. Bed शिक्षिकेनं चक्क लाईफलाईन घेतली

मीम्समधील लोक १४ ऑगस्टला सुट्टी घेण्यासाठी विविध सबबी सुचवत आहेत. हे मजेशीर मीम्स सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतायत. 

आता लांबच्या सुट्ट्यांचा मुद्दा नेमका काय ते समजून घ्या. यावेळी सुदैवाने १२ आणि १३ ऑगस्टला शनिवार, रविवार आहे तर १५ ऑगस्टला मंगळवार आहे. अशातच १४ ऑगस्टला सोमवार आहे. अशा परिस्थितीत अनेकांची आठवड्याची सुट्टी शनिवार आणि रविवारी असल्याने त्यांना ही सुट्टी तशीच मिळाली. आता सोमवार १४ तारखेला आहे, फक्त या दिवसासाठी सुट्टी मिळावी म्हणून कर्मचाऱ्यांची अवस्था नेमकी कशी झालीय याचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कारण जर तुम्हाला १२, १३, १४ आणि १५ ला सुट्टी मिळाली तर तुम्ही ४ दिवस मजा करू शकता हा या वीकेंड मागचा उद्देश आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day 2023 people are taking sick leave on 14 august netizens funny memes viral news in marathi funny memes go viral monday sick leave srk