Independence Day Bhashan: भारत देश यंदा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही यादिवशी केले जाते. भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन अगदी एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक ठिकाणी लोकांनी या मोठ्या दिवसाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. शाळा, कॉलेज, विविध सरकारी आणि खाजगी ऑफिसांमध्ये हा दिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे. १५ ऑगस्टनिमित्ताने सोसायटी, शाळा, कॉलेजांमध्ये वादविवाद स्पर्धा, भाषण स्पर्धेचंही आयोजन केलं जाते. या स्वातंत्र्यदिनी, जर तुम्हालाही अधिक चांगले भाषण द्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला भाषण सादर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात कौतुक होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्यदिनी भाषण करायचे आहे? मग ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

१. जर तुम्ही भाषणाची तयारी करत असाल तर सर्वांना प्रथम शुभेच्छा द्या. जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये भाषण देत असाल तर भाषणाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या.

२. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर आपली स्वत:ची ओळख देखील करून द्या. परंतु ही ओळख सोप्या शब्दांत आणि अगदी लहान असू द्या.

३. यानंतर तुमच्या भाषणाला सुरुवात करा. तुम्हाला भारताच्या इतिहासाची माहिती असायला हवी. स्वातंत्र्य दिनावर प्रकाश टाका आणि यावेळी आपण कोणता स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत ते ही सांगा.

४. स्वातंत्र्यदिनाचे भाषण छोटे व मुद्याला धरून असले पाहिजे. प्रेक्षकांना समजण्यास सोपे असावे तसेच भाषणात प्रभावी वाक्यांचा वापर करा. 

५. तुमच्या भाषणाला कथेचं स्वरुप द्या. ते करताना तुमच्या आवाजात भावनांचा चढउतार येऊ द्या. तुमच्या भाषणातील मुद्दे तथ्य आधारित मांडा. तारखा, नावे आणि प्रसंग अशा गोष्टींचा उल्लेख करा.

६. भाषणादरम्यान तुम्ही त्यात योग्य वाटणाऱ्या कविता आणि शायरीही म्हणू शकता. यामुळे तुमच्या बोलण्यात रस वाढेल आणि लोक तुमचं भाषणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकतील.

७. भाषणाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार माना. आभार व्यक्त करताना तुम्ही कविता किंवा चारोळीही सांगू शकता. यामुळे भाषणाचा शेवट आणखीन दमदार होईल.

अशाप्रकारे वरिल सर्व मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही यंदाच्या १५ ऑगस्टला खणखणीत भाषण देऊ शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day 2024 speech ideas tips preparing for 15 august speech easy tips in marathi pdb