India Vs Pakistan Champion’s Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाचवा आणि हायहोल्टेज सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवलाय. अशातच विविध ठिकाणी फटाके फोडून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. मात्र पुणेकरांनी तर राडाच केला, हजारोंच्या संख्येने क्रिकेट फॅन्स पुण्यातील एफसी रोड वर येत एकत्र जल्लोष केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुण्यातील एफ सी रोड कोणत्याही सणाला, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र येते. अशातच आता भारतानं विजय मिळवल्यानंतर याचा जल्लोष करण्यासाठी सर्व क्रिकेट्स फॅन्स रस्त्यावर आले आहेत. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि गाणी लावत त्यावर तरुणाई थिरकताना दिसत आहे. कुणी विराट कोहलीचे पोस्टर घेऊन नाचत आहे तर कुणी रोहित शर्माचे. तर कुणी ट्रॉफी घेऊन नाचताना दिसत आहे. लोक अक्षरश: गाड्यांवर चढून जल्लोष करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्यानं सगळेच अवाक् झाले. मात्र पुणे तिथे काय उणे, पुणेकरांचा नाद नाही करायचा म्हणतात ते हेच.

आजच्या विजयामुळे भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर यजमान संघ पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. भारताने २४२ धावांचे लक्ष्य ४३ ओव्हर्समध्येच पूर्ण केले. विराट कोहलीने वनडे फॉर्मटमधील ५१ वे शतक साजरे केले. भारताचा हा सलाहग दुसरा विजय ठरला तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

पाहा व्हिडीओ

कर्णधार रोहित शर्माने , शुभमन गिल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि पूर्ण संघानेच चांगली कामगिरी केली. भारताने या विजयासह २०१७ मधील पराभवाचा वचपा काढला आहे. तर विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा २४२ धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय जबरदस्त पद्धतीने पूर्ण केले. टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार विराट कोहली होता, ज्याने उत्कृष्ट शतक झळकावून आपल्या पुनरागमनाचा डंकाही वाजवला आहे.

Story img Loader