लंडन ते मँचेस्टर या रेल्वे प्रवासादरम्यान गॅब्रिएल फोर्सिथ या भारतीय वंशाच्या महिलेला नुकतेच वांशिक टीकेचा सामना करावा लागला. रविवारी फोर्सिथ येथील घरी जात असताना, स्थलांतरितांना मदत करणाऱ्या एका धर्मादाय संस्थेबरोबरील तिच्या कामाबद्दल चर्चा करत होती तेव्हा ही घटना घडली. जवळच्या एका प्रवाशाने जो दारू प्यायला होता त्याने तिचे संभाषण ऐकले आणि तिला धमकावण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तेव्हा वाद आणखी वाढला अशी माहिती मेट्रोने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोर्सिथने सुरुवातीला हा व्हिडिओ एक्स वर शेअर केला होता परंतु नंतर त्यावरून झालेल्या प्रतिक्रियांनंतर तो डिलीट केला. त्यानंतर हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला आहे. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, संबंधित पुरूष स्थलांतरित आणि देशाच्या स्थलांतर धोरणांवर चर्चा करताना रेकॉर्डिंग करताना दिसत आहे. दरम्यान, त्याची साथीदार, एक महिला, त्याचा उपहास ऐकत असताना तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

“तुम्ही इंग्लंडमध्ये आहात, तुम्ही काहीतरी दावा करत आहात. जर तुम्हाला काही फायदा होत नसता तर तुम्ही इंग्लंडमध्ये नसता. इंग्रज लोकांनी जग जिंकले आणि ते तुम्हाला परत दिले. आम्ही भारत जिंकला, आम्हाला तो नको होतो, आम्ही तो तुम्हाला परत दिला,” असे वक्तव्य हा माणूस व्हिडीओमध्ये करताना दिसत आहे.

हेही वाचा – महाकुंभमेळ्यात व्लॉगरने विकला चहा अन् एका दिवसात कमावले ‘इतके’ पैसे, Video Viral बघा

इंस्टाग्रामवर व्हिडिओ dannyfuckingprice ने शेअर केला. या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, एकाने कमेंट केली, “भारताने इंग्लंडवर ३-० असा विजय मिळवल्याने भाऊ खूप भारावून गेले आहेत.” दुसऱ्याने लिहिले, “जर ब्रिटनने त्यांनी चोरलेले पैसे परत केले तर ते त्यांच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या १३ ते १५ पट जास्त असेल. तुम्ही गरीब आहात, तुम्ही आमच्याकडून जे चोरले आहे तेच तुम्हाला संपूर्ण भविष्य देईल!”

तिसऱ्याने लिहिले की, “चोर चोरी केल्यानंतर असेच म्हणतो”

चौथ्याने लिहले की, “आता याला कोण सांगणार भाऊ… हे म्हणजे असे झाली की पाकीट चोरायचे, त्यातले पैसे घेऊन रिकामे पाकीट परत करण्यासारखे आहे.

फोर्सिथने X वर लिहिले “त मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की,मला कृष्णवर्णीय असण्याचा आणि माझ्या वारशाचा अभिमान आहे. मला वर्णद्वेषींची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. तुम्ही माझा अपमान करू शकता किंवा मला धमकावू शकता, पण मी जाणार नाही. मी राहीन, आणि तुम्ही राग व्यक्त करू शकता.”