India-China soldiers Dance Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला एक्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेला एक व्हिडीओ आढळून आला. या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, चिनी एमएसएएस आणि भारतीय सैन्याने एका खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा केला, यानंतर त्यांनी एकत्र डान्स करून आपला आनंद साजरा केला. या व्हिडीओत दोन्ही देशांतील सैनिक एकत्र भांगडा नृत्य करताना दिसत आहेत. पण, खरंच अशी कोणती घटना घडली आहे का, याविषयीचे सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं. ते सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर शुभंकर बिस्वासने त्याच्या प्रोफाइलवर व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील वेगवेगळ्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.
यावेळी आम्हाला १२ डिसेंबर २०१८ रोजी विष्णू सोम यांनी केलेले ट्विट आढळले.
https://twitter.com/VishnuNDTV/status/1072726180699217920
आम्हाला ADG PI – INDIAN ARMY च्या एक्स हँडलवरदेखील एक व्हिडीओ सापडला.
आम्हाला नृत्याबद्दल अनेक बातम्यादेखील आढळल्या.
या बातम्यांमध्ये नमूद केले आहे की: अलीकडेच चीनमधील चेंगडू येथे सातव्या चीन-भारत संयुक्त सराव, हँड-इन-हँड २०१८ साठी भारतीय आणि चिनी सैन्य एकत्र आले होते. सर्व नित्यक्रमानुसार चालू होते, यावेळी त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर सर्व एकत्र भांगडा नाचू लागले.
पोस्टमध्ये दावा केल्यानुसार, मध्य काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील खानयार भागात सुरू झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयब्बाचा मेन कमांडर उस्मान भाई मारला गेला. आम्हाला याबद्दल काही बातम्यादेखील आढळल्या.
निष्कर्ष :
वार्षिक सैन्य अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आणि चिनी सैन्याचा एकत्र भांगडा नृत्य करतानाचा २०१८ चा व्हिडीओ अलीकडील असल्याचा सांगून शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.