Viral Wedding सोशल मीडियावर वधू वराचे अनेक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं असतात. सोशल मीडियाचा जगात एखादी घटना वाऱ्यासारखी पसरते. अशा एका लग्नाची गोष्ट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या विचित्र लग्नाच्या चर्चेचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल..बिहारमधील भागलपूर येथील सुलतानगंज येथून एक भलताच प्रकार पुढे आला आहे. या ठिकाणी एक तरुण चक्क आपलं स्वत:चेच लग्न विसरलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तराट नवरदेव स्वत:चंच लग्न विसरला

झालं असं की हा तरुण भरपूर दारू प्यायला असून, त्याला दारु सेवन करण्याचे प्रचंड व्यसन आहे. लग्नापूर्वीही त्याने मद्य प्राशन केले. परिणामी तो नशेत तर्रर्र असल्याने लग्नालाच उपस्थित राहू शकला नाही. विवाह ठरल्याप्रमाणे नवरीला घेऊन वधू पक्षाचे लोग विवाहस्थळी पोहचले मात्र मुहुर्त होऊन गेला तरी नवरदेवाचा पत्ता नव्हता. त्यानंतर विचारपूस केली असता नवरदेव नशेत तर्र असल्याचे कळले. नवरदेवाचा कारनामा समजताच वधू पक्षाकडील लोक प्रचंड चिडले. यानंतर नवरी भलतीच चिडली असून मुलीने लग्नास नकार दिला.

हेही वाचा – World Sleep Day: ७० टक्के जोडप्यांना होतो जोडीदाराच्या घोरण्याचा त्रास, मग ते थांबवण्यासाठी हे उपाय नक्की करा!

प्रकरण पोलिसांत

बराच वेळ लग्नाच्या मंडपात हा वाद सुरु राहिला. दरम्यान, मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणाच्या नातेवाईकांसह त्यांचा मित्रपरिवार या सर्वांनाच पकडून ठेवले. या सर्वांनी विवाहासाठी आतापर्यंत झालेला खर्च परत करावा आणि हे लग्न मोडावे, अशी मागणी केली. नंतर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांतही पोहोचले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India groom forgets the marriage itself know what really occurred at sultanganj of bhagalpur in bihar srk