India and America comparison: भारतात राहणाऱ्या अमेरिकन महिलेने , अमेरिकेपेक्षा भारत चांगला आहे असे तिला वाटणारे घटक सांगितले. त्यात आरोग्यसेवेपासून ते वाहतुकीपर्यंत सर्व काही होते. अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिलेल्या सुविधांपेक्षा भारताकडे आपल्या लोकांसाठी चांगल्या सुविधा आहेत असे तिने म्हटले. तिच्या अलीकडच्या व्हिडीओमध्ये तिने अमेरिका खरंतर भारतासारखी हवी होती, अशा दहा गोष्टींची यादी शेअर केली.
“भारत अशा दहा गोष्टी करतो जे मला वाटते की आपण अमेरिकेत केले पाहिजे.” डिजिटल मनी ट्रान्सफर, भारतीय शहरांमध्ये वाहतूक सेवा, डिलिव्हरी ॲप्सची सोय, डॉक्टरांची उपलब्धता, कचरा व्यवस्थापन, शाकाहारी अन्न पर्याय आणि बरंच काही लिहित तिने ही यादी तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओसह शेअर केली.
डिजिटल इंडिया
तिच्या व्हिडीओची सुरुवात देशातील डिजिटलायझेशनवर प्रकाश टाकून झाली. “आयडीपासून ते यूपीआय पेमेंटपर्यंत सर्व काही डिजिटल असल्याचे दिसते. हे सर्व ऑनलाइन आहे आणि खूप सोयीस्कर आहे”, असं डिजिटल इंडियाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देताना ती म्हणाली. “मी फक्त माझा फोन घेऊन बाहेर जाऊ शकते आणि तेवढं पुरेसे आहे. मला वाटते की युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ही अशी गोष्ट आहे जी संपूर्ण जगाने स्वीकारली पाहिजे”, असं ती पुढे म्हणाली.
आरोग्यसेवा
पुढे तिने भारतातील आरोग्य आणि आरोग्यसेवा या महत्त्वाच्या घटकाबद्दल सांगितले. तिने सुचवलं की, अमेरिका डॉक्टरांच्या सल्ल्यामध्ये आणि औषध खरेदीमध्ये एक पाऊल मागे आहे. तिच्या मते, “भारतात डॉक्टर शोधणे खूप सोपे आहे. बहुतेक वेळा तर अपॉइंटमेंटची आवश्यकतादेखील नसते आणि औषधांसाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते. अमेरिकेत डॉक्टरांना भेटण्यासाठी तुम्हाला आठवडे किंवा महिने आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागते.”
“भारतात आल्यावर मला पहिल्यांदाच डॉक्टरांनी अँटीबायोटिक्ससोबत प्रोबायोटिक लिहून दिले. या दोन्ही गोष्टी एकत्र घेणे खरंच अर्थपूर्ण आहे”, असे अमेरिकन महिलेने पुढे म्हटले.
अमेरिकन महिलेचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ तिच्या @kristenfischer3 या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला तब्बल २.४ मिलियन व्ह्युज आले आहेत, तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओवर कमेंटसुद्धा केली आहे.