शहरात घरफोडी, रस्त्यावर महिलांचे दागिने चोरणे किंवा प्रवासादरम्यान पाकीट चोरणे आदी घटना तुमच्याही कानावर पडत असतील किंवा तुमच्या आजूबाजूलाही घडत असतील. त्यामुळे प्रत्येक जण सावधगिरी म्हणून झोपण्याच्या आधी घराचे दरवाजे नीट बंद करून घेतात, घरातील मौल्यवान आणि महागड्या वस्तू घरात न ठेवता लॉकरमध्ये ठेवतात. काही जण तर सीसीटीव्ही कॅमेरा, तर घराबाहेर पडताना दारं-खिडक्या नीट बंद केले आहेत का याची खात्रीसुद्धा करून घेतात. पण, आज एका पठ्ठ्याने त्याची एक मौल्यवान वस्तू चोरी होऊ नये म्हणून अजब उपाय शोधून काढला आहे.

दिल्ली एनसीआरचे रहिवासी भारतातील फोन व इतर उपकरणांच्या चोरीवर सोशल मीडियावर चर्चा करत होते. तर यादरम्यान एका एक्स (युजरने) त्यांचे उपकरण चोरी होऊ नये म्हणून कोणती युक्ती केली हे स्पष्ट केलं आहे. युजरचे अ‍ॅपल कंपनीचे एअरपॉड्स असतात. अ‍ॅपल कंपनीचे अनेक प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण हे महाग तर असतातच आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत थोडे खाससुद्धा असतात. त्यामुळे या कंपनीच्या कोणत्याही वस्तू चोरी करणे चोरांसाठी फायदेशीर ठरते. तर ही बाब लक्षात घेऊन पठ्ठ्याने काय जुगाड केला पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: ‘तिच्या आठवणीत…’ त्याने सजवली रिक्षा; प्रेमाची गोष्ट अन् रिक्षात लावलेली ‘ती’ वस्तू पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पोस्ट नक्की बघा…

एका तरुणाने अ‍ॅपल एअरपॉड्सवर मायक्रोमॅक्सच्या लोगो कोरून घेतला आहे. या २३ वर्षीय तरुणाने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, जेव्हा त्याने इयरफोन्स विकत घेतले, तेव्हा तो दिल्ली एनसीआरमध्ये राहत होता. त्याच्या अनेक मित्रांची उपकरणे तिथे चोरीला गेली होती. एकेदिवशी भरदिवसा बाईकवरून गुंडांनी जवळच्या लोकांचे फोन हिसकावलेले त्याने पाहिले होते. खरेदीच्या वेळी एअरपॉड्सवर हे विनामूल्य मायक्रोमॅक्सचा लोगो कोरून घेतला.

तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, एक्स (युजर) अ‍ॅपल कंपनीचे एअरपॉड्स चोरी होऊ नये म्हणून तरुणाने स्वतःचे एअरपॉड्स मायक्रोमॅक्सच्या लोगोसह कोरून घेतले आहेत. त्यामुळे चोर मायक्रोमॅक्स कंपनीचा लोगो पाहिल्यावर एअरपॉड्स चोरणार नाही असा तरुणाचा अंदाज आहे. तुम्ही पाहू शकता एअरपॉड्सवर मायक्रोमॅक्सचा लोगो आहे, म्हणजेच हाताच्या मुठीचे चिन्ह आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @basked_samosa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे; जे पाहून तुम्ही काही क्षणासाठी हसाल, पण तरुणाला या कल्पनेसाठी हुशारसुद्धा म्हणाल.