पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १ विकेटनं पराभव करणाऱ्या बांगलादेशनं काल झालेल्या दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यातही बांगलादेशनं विजय संपादन केलं. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं २-० अशी आघाडी करत मालिका खिशात घातली. परंतु, कालच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने बोटाला दुखापत झाल्यानंतरही वादळी खेळी केली. फलंदाजीच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर येऊन रोहितने मैदानात षटकारांचा पाऊस पाडला. २८ चेंडूत ५१ धावांची झुंजार खेळी करून रोहितने शेवटच्या चेंडूपर्यंत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. भारताचा पराभव झाला असला, तरी धडाकेबाज खेळीमुळं रोहित पुन्हा एकदा चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे मैदानात कोणत्या संघाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, हे सांगता येत नाही. कालच्या सामन्यातही तसंच काहिसं घडलं. पण रोहित शर्माची चमकदार कामगिरीनं चाहत्यांनी ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा