India Post Payment Bank : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे अनेक ग्राहक सध्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांचे (फिशिंग) बळी ठरत आहेत. या ग्राहकांना फसवणूक करणाऱ्या ठगांकडून एक मेसेज पाठवला जात आहे, ज्यात त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पॅन कार्ड तपशील अपडेट न केल्यास त्यांचे बँक अकाउंट गोठवले जाईल, अशी सूचना दिली जात आहे. इतकेच नाही, तर त्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पॅन अपडेट करण्यासाठी एक बनावट लिंकदेखील दिली जात आहे, अशा प्रकारे अनेक युक्त्या वापरून ऑनलाईन ठग ग्राहकांच्या अकाउंटमधील पैसे गायब करीत आहेत.

पण, केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने अशा प्रकारचा कोणताही मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नका, अशी सूचना दिली आहे. कारण- हे मेसेज बनावट असल्याची पुष्टी त्यांनी केली आहे. त्यामुळे ग्राहकांनीही कोणत्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करून कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असा इशारा देण्यात आला आहे.

india post payment bank
इंडिया पोस्ट पेमेंट बँक

अशा प्रकारे केले जाते फसवणूक?

ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज पाठवला जात आहे आणि तो म्हणजे, “प्रिय ग्राहक, तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते आज ब्लॉक करण्यात आले आहे. कृपया तुमचे पॅन कार्ड येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून, त्वरित अपडेट करा.” असा मेसेज पाहिल्यानंतर काही सेकंद आपल्याला खरंच वाटेल की, तो पोस्ट पेमेंट बँकेकडून आला असावा. पण, अशा प्रकारचा कोणताही मेसेज आला, तर त्यावर क्लिक करू नका.

अशी फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?

सोशल मीडिया पोस्टमध्ये, IPPB ने सुरक्षित डिजिटल बँकिंग कसे करावे याबाबतची माहिती शेअर केली आहे.

१) आयपीपीबीच्या सूचनेनुसार, खातेधारकांनी नियमितपणे पासवर्ड अपडेट करावा.
२) ऑनलाईन कोणत्याही बनावट ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करू नका.
३) मेसेजद्वारे येणारी कोणतीही संशयास्पद लिंक ओपन करू नका.
४) कुठेही सार्वजनिक वायफायचा वापर करू नका.
५) मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये बँकिंग सेवांचा वापर करून झाल्यावर, ते अकाउंट लॉग आउट करण्यास विसरू नका.

काय करावे? आणि काय करू नये?

india post payment bank
इंडिया पोस्ट पेमेंट बँक

मोबाईलवर येणारे ईमेल किंवा मेसेज आधी काळजीपूर्वक वाचा. पाठविणाऱ्याचे नाव पाहून, त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तसेच तुमची वैयक्तिक माहिती त्यावर शेअर करू नका. कोणत्याही मेसेजमध्ये दिलेल्या लिंक कधीही ओपन करू नका. मेसेजच्या भाषेकडे लक्ष द्या आणि सार्वजनिक नेटवर्क वापरणे टाळा. बनावट कॉल किंवा मेसेजना रिप्लाय करू नका.

Story img Loader