मागील काही आठवड्यांपासून भारतामध्ये #MeToo मोहिमेने जोर धरला आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडताना दिसत आहेत. जगभरामध्ये मागील वर्षभरापासून ही मोहिम राबवली जात असतील तरी भारतात या मोहिमेने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जोर धरायला सुरुवात केली. पाहता पाहता सिनेसृष्टी, प्रसारमाध्यमे, राजकारण, क्रिडा अशा सर्वच क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती या मोहिमेअंतर्गत दिली. या मोहिमेचा वाढता प्रभाव पाहून या वर्षी एप्रिल महिन्यात गुगलने #MeToo हा हॅशटॅग जगभरामधून कुठेकुठे सर्वाधिक चर्चेत राहिला यासंदर्भातील एक मॅपच तयार केला आहे. या मॅपमध्ये ज्या देशांमध्ये हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे त्या देशाचा नकाशा जास्त प्रकाशित दिसतो. आणि वाईट गोष्ट म्हणजे मागील काही दिवसांपासून भारताचा नकाशा इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त प्रखर दिसत आहे.
‘इंडिया शायनिंग’! देशातील #MeToo मोहिमेमुळे जगभरात भारताची ‘छी थू’
तुम्हीच जाणून घ्या तुमच्या शहरात का आहे #MeToo ची चर्चा
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-10-2018 at 16:32 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India shines bright for the wrong reasons thanks to me too