India vs Australia Final Viral Video : सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये आयसीसी विश्वचषकाची क्रेझ पाहायला मिळतेय. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी (१९ नोव्हेंबर ) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आमने-सामने येणार आहेत. या अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे. विश्वचषकात आतापर्यंत झालेले भारताचे सामने भारतीयांसाठी अविस्मरणीय ठरले. कारण- प्रत्येक सामन्यात भारताचा विजय, विराट कोहलीचा वनडे शतकांचा विश्वविक्रम व मोहम्मद शमीची आक्रमक गोलंदाजी यांमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना आनंद साजरा करण्याच्या संधी मिळाल्या. अखेर आज विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे आणि भारतच हा विश्वचषक जिंकेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. असाच विश्वास एका रेस्टॉरंटमालकाने व्यक्त करीत ग्राहकांना मोफत छोले-कुलचे खायला देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओत एक रेस्टॉरंटमालक भारत विश्वचषक जिंकताच तो सर्वांना मोफत खाऊ घालेल, असे आश्वासन देताना दिसत आहे. रेस्टॉरंटमालकाला विश्वास आहे की, भारतच विश्वचषक जिंकेल आणि या आनंदात त्याने आपल्या ग्राहकांना एक उत्तम ऑफर दिली आहे. व्हिडीओमध्ये रेस्टॉरंटमालक सांगत आहे की, भारत विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो सर्वांना मोफत छोले-कुलचे खायला देईल.

IND vs AUS Final Live, World Cup 2023 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या प्रवेशद्वारावर क्रिकेटप्रेमींची गर्दी

ज्या ग्राहकाने ही ऑफर ऐकून, त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला त्याचाही तो जे ऐकतोय त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे ग्राहकाने रेस्टॉरंटमालकाला पुन्हा विचारले की, खरंच तुम्ही फ्रीमध्ये छोले-कुलचे देणार का? त्याने दोन वेळा तोच प्रश्न विचारला. यावेळी रेस्टॉरंटमालक त्याच्या शब्दावर ठाम होता. त्याने पुन्हा फ्रीमध्ये छोले-कुलचे देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. यावेळी रेस्टॉरंटमालकाने देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करीत आपल्या मनगटावरील भारताचा नकाशा दाखवला. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स त्या रेस्टॉरंटचा पत्ता विचारत आहेत.

दरम्यान, क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्याबाबत चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एका बाजूला कधी हार न मानणारी टीम इंडिया आणि दुसऱ्या बाजूला शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी झगडणारी टीम ऑस्ट्रेलिया. पण, टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे आणि अंतिम सामन्यात हीच टीम शानदार कामगिरी करील, अशी आशा चाहत्यांना आहे.