भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये सुरु आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने दुसऱ्या कसोटी सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. एजाजने एक एक करत दहा गडी तंबूत पाठवले. एजाज पटेलने अनिल कुंबलेचा विक्रम मोडीत काढला आहे. एजाज पटेलने ४७.५ षटकं टाकत १० गडी बाद केले. यात त्याने १२ षटकं निर्धाव टाकली. तर २.४९ च्या सरासरीने ११९ धावा दिल्या. अनिल कुंबलेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये १० गडी बाद केले होते.

चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांना एजाज पटेलने खातंही खोलू दिलं नाही. भारतीय फलंदाजांची घसरगुंडी पाहता नेटकऱ्यांनी आता प्रशिक्षक राहुल द्रविडला फलंदाजीला येण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या कसोटीबाबत नेटकऱ्यांनी मजेशीर ट्वीट केले आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – विल यंग, ​​टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.

Story img Loader