भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की त्याचा फिव्हर काय असतो हे वेगळं सांगायला नको. अगदी दोन्ही देशांसाठी करो या मरोची स्थिती असते. हा समना म्हणजे आपल्यासाठी ‘इज्जतीचा सवाल’ किंवा ‘मैदानातले युद्ध’ असतं. ‘बाकी तुम्ही काहीही करा पण पाकिस्तानला मात्र जिंकू द्यायचं नाही’ असं अप्रत्यक्षरित्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच सुरू असतं. भारत जिंकावा आणि पाक हरावा यासाठी होम हवन, पुजापाठ, उपास- तापास वगैरे आलेच ते वेगळं. असो, तर रविवारी इंग्लडमध्ये रंगलेला सामना असाच काहीसा होता. हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी दोन्ही देशांचे ‘जबरा फॅन’ टीव्हीला अगदी चिटकून बसले होते. मैदानात जमलेल्या क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरून सारखा कॅमेरा फिरत होता. आता हाय व्होल्टेज सामन्यात प्रेक्षकांच्या गर्दीत नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं हे कॅमेरामनला चांगलं ठावूक असतं, ते यावेळीही पाहायला मिळालं. या सामन्यादरम्यान पावसाची ये- जा सुरु असतानाच टिपलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
India vs Pakistan champions trophy 2017 : युवीकडून ‘सामनावीराचा पुरस्कार’ कॅन्सरग्रस्तांना समर्पित
‘भारताने पाकिस्तानवर ताबा मिळवला’ अशी ओळ देऊन हा फोटो व्हायरल होत आहे. एक जोडपं.. त्यातली महिला पाकिस्तान टीमची ‘फॅन’ तर तिच्या शेजारच्या टीम इंडियाचा ‘चाहता’. दोघांच्या पाठीवर आपापल्या संघाचे ध्वज. तेव्हा गर्दीतून ते दोघंही खूपच उठून दिसत होते. त्यामुळेच त्यांची इतकी चर्चाही झाली. आता हे दोघंही नेमके कोण आहेत ते कळू शकलं नाही पण नेटिझन्स या दोघांना शोधून काढतील हे नक्की. एरव्ही भारत- पाकिस्तानचे सामने असतात तेव्हा भारतीय संघाचा चाहता सुधीर कुमार गौतम आणि पाकिस्तान संघाचे चाहते ‘चाचा शिकागो’ उर्फ मोहम्मद बशीर यांचीच चर्चा असते पण यावेळीच्या India vs Pakistan champions trophy 2017मध्ये मात्र या ‘जबरा जोडी’चीच चर्चा पाहायला मिळाली.
वाचा : ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी त्याने नाकारली २२ लाखांची नोकरी