भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना इंग्लडमध्ये काल रंगला आणि या सामन्यात पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवत टीम इंडियाने पाकिस्तान संघाला ४४० व्होल्टचा झटका दिलाय. एकीकडे दमदार खेळी करत रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज, विराट, हार्दिक पांड्याने धावांचा डोंगर पाकिस्तान संघापुढे उभा केला. रोहित शर्मा आणि शिखर धवनने १४७ चेंडूंमध्ये १३६ धावांची भागिदारी रचत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. तर ३२ चेंडूत ५३ धावांची धमाकेदार खेळी करत युवीनेही पाकिस्तान संघाला चांगलंच झोडपलं. कॅप्टन विराटबद्दल तर सांगायलाच नको ८१ धावा काढत तो भारतीय संघाचा ‘किंग’ असल्याचं त्याने दाखवून दिलं.

India vs Pakistan champions trophy 2017: खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर वहाब रियाजचा ‘कचरा’

आता हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने मैदानात पाकिस्तानी संघाला चांगलच झोडपल्यानंतर इथं चाहत्यांनी देखील एकापेक्षा एका ‘शाब्दिक बाण’ फेकत आधीच घायाळ झालेल्या पाकला सोशल मीडियावरही पुरते नाकी नऊ आणले. तेव्हा मैदानात झोडपल्यानंतर दुसरीकडे भारतीय नेटिझन्सदेखील जे काही उरली सुरलेले ‘वाभाडे’ काढण्याची कसर देखील भरून काढली. तेव्हा कालपासूनच #IndVsPak match हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत असून पाकिस्तान टीमवर एकापेक्षा एक विनोद व्हायरल होत आहेत. ‘बेटा तुमसे ना होगा’ असं म्हणत भारतीय नेटीझन्सने तर अक्षरश: पाकिस्तानी चाहते अन् खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. आधीच पाकिस्तान संघातला महागडा गोलंदाज वहाब रियाज याचा भारतीय चाहत्यांनी ‘कचरा’ केला, आता तर जे काही उरले सुरले खेळाडू होते त्यांचाही ‘कचरा’ करायला सुरूवात केलीय.