भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धींचा सामना कायम ‘हाय व्होल्टेज’ असतो. दोन्ही देशाचे खेळाडूही ‘करा किंवा मरा’ या पद्धतीने खेळतात. सामना जिंकण्यासाठी ते काहीही करताना दिसतात. पाकचे शाहिद आफ्रिदी, आमिर सोहेल, जावेद मियाँदाद, वासिम अक्रम, वकार युनूस आणि टीम इंडियाचे किरण मोरे, नवज्योतसिंग सिद्धू, वेंकटेश प्रसाद, सौरव गांगुली, गौतम गंभीर या खेळाडुंनी मैदानावर परस्परांना दिलेली खुन्नस आठवा. अनेकवेळा असे क्षण घडले की, मैदानावरच हे खेळाडू हातघाईवर उतरल्याचे दिसले. पंचांनी व इतर खेळाडुंनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळेच मैदानावर व मैदानाबाहेर भारत-पाक सामन्यावेळी प्रचंड तणाव व दबाव असतो. रविवारी एजबस्टन येथे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यावेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. आपल्या तडाखेबाज फलंदाजीने एजबस्टनचे मैदान गाजवणाऱ्या डावखुऱ्या युवराज सिंगने खिलाडीवृत्तीचे दर्शनही घडवले. सोशल मीडियावर त्याच्या याच कृतीचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला युवी कसा ‘जंटलमन’ आहे, हे सांगताना त्याच्या चाहत्यांना शब्दही अपुरे पडत आहेत.

प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व युवराज सिंग यांनी काही क्षणातच संपूर्ण खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतली. युवी तर पाक गोलंदाजांच्या पार चिंधड्याच उडवत होता. त्याने एकाही गोलंदाजाला सोडले नाही. सामन्यातील ४६ वे षटक टाकण्यासाठी पाकचा डावखुरा वेगवान गोलंदाज वहाब रियाज आला. युवराजने त्याच्या या षटकातही भरपूर धावा काढल्या. षटकादरम्यानच वहाब रियाज गोलंदाजी करताना अचानक उजवा घोटा दुखावल्यामुळे खाली पडला व वेदनेने तो व्याकूळ झाला. तो लगेचच आपल्या पायातील बूट काढून घोटा न्याहाळू लागला. त्याचवेळी स्ट्राइकवर असलेला युवराज त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. वहाब रियाज पुढे गोलंदाजी करू शकला नाही पण युवराजने या कृतीने मात्र सर्वांची मने जिंकली.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता

दरम्यान, हा सामना टीम इंडियाने एकहाती जिंकला. रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या फलंदाजीने प्रथम धावांचा डोंगर उभारण्यात आला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत टीम इंडियाला १२४ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे पावसाने या सामन्यात अनेकवेळा व्यत्यय आणला होता.

Story img Loader