भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धींचा सामना कायम ‘हाय व्होल्टेज’ असतो. दोन्ही देशाचे खेळाडूही ‘करा किंवा मरा’ या पद्धतीने खेळतात. सामना जिंकण्यासाठी ते काहीही करताना दिसतात. पाकचे शाहिद आफ्रिदी, आमिर सोहेल, जावेद मियाँदाद, वासिम अक्रम, वकार युनूस आणि टीम इंडियाचे किरण मोरे, नवज्योतसिंग सिद्धू, वेंकटेश प्रसाद, सौरव गांगुली, गौतम गंभीर या खेळाडुंनी मैदानावर परस्परांना दिलेली खुन्नस आठवा. अनेकवेळा असे क्षण घडले की, मैदानावरच हे खेळाडू हातघाईवर उतरल्याचे दिसले. पंचांनी व इतर खेळाडुंनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळेच मैदानावर व मैदानाबाहेर भारत-पाक सामन्यावेळी प्रचंड तणाव व दबाव असतो. रविवारी एजबस्टन येथे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यावेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. आपल्या तडाखेबाज फलंदाजीने एजबस्टनचे मैदान गाजवणाऱ्या डावखुऱ्या युवराज सिंगने खिलाडीवृत्तीचे दर्शनही घडवले. सोशल मीडियावर त्याच्या याच कृतीचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला युवी कसा ‘जंटलमन’ आहे, हे सांगताना त्याच्या चाहत्यांना शब्दही अपुरे पडत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा